Join us

वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी करोडपती बनलाय हा तरुण, सांगितला कोट्यधीश होण्याचा खास फॉर्म्युला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 16:30 IST

अमन गोयल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटेल आहे की, "मी सकाळळी 5 वाजता उठत नाही आणि थंड पाण्यानेही आंघोळ करत नाही. मी पुस्तकेही वाचत नाही. मी अशा कुठल्याही आदर्श सवयी फॉलो करत नाही. जे लोक कोट्यधीश होण्यासाठी आवश्यक असल्याचे सांगतात. तरीही मी वयाच्या 20 व्या वर्षी कोट्यधीश आहे.

आजकाल, जीवनात यशस्वी होण्याचा अर्थ, चांगला पैसा कमावणे, असा गृहित धरला जातो. अर्थात, तुम्ही चांगले पैसे कमवायला सुरुवात केली, म्हणजे लोक तुमच्याकडे एक यशस्वी व्यक्ती म्हणणून बघू लागतात. जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर कठोर परिश्रमाला पर्याय नाही, असे म्हणणारे अनेक लोक आपण ऐकले असतील. मात्र, वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षीच कोट्यधीस बनलेल्या एका तरुणाने, ही गोष्ट नाकारली आहे. मुंबईतील ग्रेलॅब्‍स एआयचे (GreyLabs AI) को-फाउंडर आणि सीईओ अमन गोयल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टच्या माध्यमाने कोट्यधीश होण्याच्या फॉर्म्युल्यासंदर्भात माहिती दिली आहे.

या तरुणाने नाव आहे अमन गोयल. अमन यांनी 2017 मध्ये आयआयटी मुंबईतून कंप्यूटर सायन्समध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेतली. यानंतर त्यांनी Cogno AI ची स्थापना केली होती. अमन यांचे हे स्टार्टअप नंतर एक्‍सोटलने विकत घेतले होते. यानंतर अमन यांनी ग्रेलॅब्‍स एआची सुरुवात केली. आपल्या या स्टार्टअपद्वारेच वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षातच अमन कोट्यधीश बनले.

कोट्यधीश होण्याचा फॉर्म्युला -अमन गोयल यांनी त्यांच्या पोस्टमध्ये यशाचा फॉर्म्युला सांगितला आहेत. त्यांनी म्हटले आहे, कुणाचीही कॉपी करण्यापेक्ष केवळ 3 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, कोणताही व्यवसाय यशस्वी होईल. सर्वप्रथम तुम्हाला असे काहीतरी बनवावे लागेल ज्याचे मूल्यही असेल आणि ज्याची लोकांना गरजही असेल. ते ग्राहकांना विका आणि कोट्यधीश होईपर्यंत हीच क्रिया करत रहा. मग तुम्ही 12 वाजता झोपून उठता की, पुस्तक वाचता, याने काहीही फरक पडत नाही.

अमन गोयल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटेल आहे की, "मी सकाळळी 5 वाजता उठत नाही आणि थंड पाण्यानेही आंघोळ करत नाही. मी पुस्तकेही वाचत नाही. मी अशा कुठल्याही आदर्श सवयी फॉलो करत नाही. जे लोक कोट्यधीश होण्यासाठी आवश्यक असल्याचे सांगतात. तरीही मी वयाच्या 20 व्या वर्षी कोट्यधीश आहे.

टॅग्स :व्यवसायपैसा