Join us
Daily Top 2Weekly Top 5

आयफोन-१६ चे सर्व व्हेरियन्ट्स रिलायन्स डिजिटलमध्ये उपलब्ध; न मिळाल्यास दुप्पट रक्कम परत करण्यात येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 08:50 IST

‘रिलायन्स डिजिटल’ने अधिकृतरीत्या ही घोषणा केली आहे. सर्वोत्तम उत्पादने व ग्राहक सेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या कंपनीने पूर्वनोंदणी केलेलीच आवृत्ती पुरवली जाईल, याची हमी ग्राहकांना दिली आहे.

मुंबई : बहुप्रतीक्षित आयफोन-१६ च्या सर्व आवृत्त्या (व्हेरियंट्स) देशातील सर्वांत मोठी इलेक्ट्रॉनिक्स रिटेल शृंखला ‘रिलायन्स डिजिटल’च्या देशभरातील स्टोअर्समध्ये तसेच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

‘रिलायन्स डिजिटल’ने अधिकृतरीत्या ही घोषणा केली आहे. सर्वोत्तम उत्पादने व ग्राहक सेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या कंपनीने पूर्वनोंदणी केलेलीच आवृत्ती पुरवली जाईल, याची हमी ग्राहकांना दिली आहे. तसे न झाल्यास बुकिंग रकमेपेक्षा दुप्पट रक्कम परत करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. यंदा आयफोन-१६ बाबत कमालीची उत्सुकता आहे. ‘रिलायन्स डिजिटल’वर त्याची गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट पूर्वनोंदणी झाली आहे. मागणीत मोठी वाढ झाली असली तरी सर्व पूर्वनोंदणी वायदे पूर्ण करण्याची पूर्ण तयारी ‘रिलायन्स डिजिटल’ने केली आहे. ‘रिलायन्स डिजिटल’च्या प्रवक्त्याने सांगितले की, आयफोन-१६ ला मिळालेल्या प्रतिसादाने आम्ही भारावून गेलो आहोत. आम्ही आमच्या ग्राहकांना आश्वस्त करू इच्छितो की, आम्ही वचनपूर्तीसाठी सज्ज आहोत. दुप्पट भरपाईच्या हमीसह आम्ही सेवेचे नवीन मानक स्थापन केले आहे. ( वा. प्र.)

टॅग्स :अॅपल