Join us

अक्षय कुमार आणि विरेंद्र सेहवागनं या कंपनीत लावला पैसा, ऑर्गेनिक प्रोडक्ट्स विकते कंपनी; 53 देशांत जातो माल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 18:47 IST

"अक्षय कुमार आणि विरेंद्र सेहवाग यांच्यासह गुंतवणूकदारांकडून 14.5 कोटी रुपये उभारल्याचे कंपनीने म्हटले आहे."

पुण्यातील सेंद्रिय खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या टू ब्रदर्स ऑरगॅनिक फार्म्स (TBOF), या कंपनीत बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि क्रिकेटर विरेंद्र सेहवाग यांनी पैसा गुंतवल्याचे वृत्त आहे. यासंदर्भत अक्षय कुमार आणि विरेंद्र सेहवाग यांच्यासह गुंतवणूकदारांकडून 14.5 कोटी रुपये उभारल्याचे कंपनीने म्हटले आहे. मात्र, अक्षय कुमार आणि विरेंद्र सेहवाग यांनी या कंपनीत नेमकी किती रुपयांची गुंतवणूक केली, याचा खुलासा अद्याप झालेला नाही.

कंपनी या कामासाठी लावणार जमा केलेला पैसा - टू ब्रदर्स ऑरगॅनिक फॉर्म्सच्या (TBOF) फाउंडर्सपैकी एक सत्यजीत हांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉलीवुड अभिनेता अक्षय कुमार, क्रिकेटर विरेंद्र सेहवाग आणि काही इतर हाय नेटवर्थ असलेल्या व्यक्तींनी प्री-सीरीज A फंडिंग राउंडअंतर्गत कंपनीमध्ये एकूण 14.5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. हांगे म्हणाले, कंपनी या पैशांचा वापर आपली मॅन्युफॅक्चरिंग कॅपेसिटी वाढविण्यासाठी, फॉर्मर ट्रेनिंग सेंटर तयार करण्यासाठी आणि आपला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय वाढविण्यासाठी करेल. तसेच या इनव्हेस्टमेंटमुळे शेतकऱ्यांचे सशक्तीकरण होईल आणि गावांतील महिलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

53 हून अधिक देशांमध्ये आपले प्रोडक्ट विकते कंपनी -या फंडिंग राउंडमध्ये कॉरपोरेट लॉयर आणि IC युनिव्हर्सल लिगलमध्ये सिनियर पार्टनर तेजेश चैतलांगी, सध्याचे स्टेकहोल्डर दुर्गा देवी वाघ, क्रेस्ट व्हेंचर्स, सीरियल आंत्रप्रेन्योर जावेद टपिया आणि ग्लोबल बिझनेस लिडर राजू चेकुरी यांचा समावेश आहे. टू ब्रदर्स ऑरगॅनिक फॉर्म्स आपले प्रॉडक्ट्स 53 हून अधिक देशांतील 1000 हून अधिक शहरांमध्ये आपल्या ऑफिशिअल वेबसाइट, मोबाइल अॅप्लीकेशन, मुख्य ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि मुख्य फूड सुपरस्टोर्सच्या माध्यमाने विकते.

टॅग्स :अक्षय कुमारविरेंद्र सेहवागव्यवसायगुंतवणूक