Join us

Airtel आणि Jioच्या ग्राहकांकडे आज अखेरची संधी, स्वस्तात करा रिचार्ज; उद्यापासून प्लान्स महागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 16:22 IST

रिलायन्स जिओ, एअरटेल  ३ जुलैपासून आपले सर्व प्लान्स महाग करणार आहेत. तर व्होडाफोन आयडियाचे रिचार्ज प्लान्स ४ तारखेपासून महाग होणार आहेत.

रिलायन्स जिओ, एअरटेल  ३ जुलैपासून आपले सर्व प्लान्स महाग करणार आहेत. तर व्होडाफोन आयडियाचे रिचार्ज प्लान्स ४ तारखेपासून महाग होणार आहेत. म्हणजेच आता कोट्यवधी युजर्सना रिचार्ज करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. सर्व टेलिकॉम कंपन्यांनी प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनच्या किंमतीत २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. अशा तऱ्हेने स्वस्तात रिचार्ज करायचं असेल तर तुमच्याकडे आता फक्त काही तास शिल्लक आहेत. कारण आज रात्री १२ वाजल्यापासून जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्यांचे प्लान्स महागणार आहेत. जाणून घेऊया आता तुम्हाला किती पैसे खर्च करावे लागणार आहेत.

रिलायन्स जिओचे प्लान्स

जिओच्या १५५ रुपयांच्या प्लानची किंमत आता १८९ रुपये होणार आहे, तर जिओच्या २३९ रुपयांच्या प्लॅनची किंमत २९९ रुपये होणारे. वार्षिक प्लानमध्ये सर्वात मोठी वाढ झाली असून आता २,९९९ रुपयांऐवजी आता त्यासाठी ३,५९९ रुपये मोजावे लागतील.

एअरटेलचे प्लान्स

जिओपाठोपाठ एअरटेलनंही प्रीपेड आणि पोस्टपेड प्लान्सच्या किंमतीत वाढ केली आहे. एअरटेलच्या १७९ रुपयांच्या प्लानसाठी आता १९९ रुपये मोजावे लागतील. तर १,७९९ रुपयांच्या वार्षिक प्लानची किंमत आता १,९९९ रुपये मोजावे लागणार आहेत.

व्हीआयचे प्लान्स

४ जुलैपासून व्होडाफोन-आयडियाचेबी प्लान्सही महागणार आहेत. व्हीआयचा १७९ रुपयांचा बेसिक प्लॅन ४ जुलैपासून १९९ रुपयांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे कंपनीनं आपल्या टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत जवळपास २० टक्क्यांनी वाढ केलीये. तर व्होडाफोनचा १७९९ रुपयांचा प्लॅन १९९९ रुपयांना मिळेल.

 

टॅग्स :रिलायन्स जिओव्होडाफोन आयडिया (व्ही)एअरटेल