Join us  

Air India विकणार प्रॉपर्टी!, 13.3 लाखांत दिल्ली-मुंबईसह 10 शहरांमध्ये घर खरेदी करण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 4:38 PM

Air India : एअर इंडियाने जारी केलेल्या नोटीसनुसार, मुंबईत एक निवासी प्लॉट व फ्लॅट, नवी दिल्लीत पाच फ्लॅट, बंगळुरूमध्ये एक निवासी प्लॉट आणि कोलकाता येथे चार फ्लॅट आहेत.

नवी दिल्ली : कर्जबाजारी विमान कंपनी एअर इंडिया आता पैसे जमा करण्यासाठी देशातील अनेक शहरांमधील आपले फ्लॅट आणि इतर मालमत्ता (यात निवासी, व्यावसायिक आणि भूखंडांचा समावेश आहे) विक्री करण्याची योजना आखत आहे. एअर इंडियाने या माध्यमातून 250 ते 300 कोटी रुपये जमा करण्याची योजना आखली आहे. ही मालमत्ता देशाच्या 10 मोठ्या शहरांमध्ये रहदारीच्या ठिकाणी आहे. 18 जून रोजी राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार, यासाठी ई-बोली (Online auction) घेण्यात येणार आहे. ही 8 जुलै 2021 पासून सुरू होईल आणि 9 जुलै 2021 रोजी बंद होईल. (air india e auction flat properties in 10 cities start by 8 july 2021 check price location)

13.3 लाख रुपये होणार सुरुवातीची बोलीमनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, या युनिट्सची सुरूवातीची बोली 13.3 लाख रुपयांपासून सुरू आहे. ग्राहकांना दीडशे कोटी रुपयांपर्यंत बोली लावता येणार आहे. या लिलावाच्या स्लॉटमध्ये बर्‍याच मालमत्ता आहेत, ज्या यापूर्वी अनेकदा विक्रीसाठी ठेवल्या गेल्या आहेत.

या शहरांमध्ये आहे मालमत्ताएअर इंडियाने जारी केलेल्या नोटीसनुसार, मुंबईत एक निवासी प्लॉट व फ्लॅट, नवी दिल्लीत पाच फ्लॅट, बंगळुरूमध्ये एक निवासी प्लॉट आणि कोलकाता येथे चार फ्लॅट आहेत. कंपनी या सर्व मालमत्तांची विक्री करेल. त्याचप्रमाणे औरंगाबादमध्ये एक बुकिंग कार्यालय आणि स्टाफ क्वार्टर, नाशिकमधील सहा फ्लॅट्स, नागपुरात बुकिंग कार्यालय,  भुजमधील एअरलाइन्सचे हाऊस आणि एक निवासी प्लॉट, तिरुअनंतपुरममधील एक निवासी प्लॉट आणि मंगरुरू येथे दोन फ्लॅट आहेत.

10 टक्क्यांपर्यंत मिळेल सूटएअर इंडियाने खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी यातील काही मालमत्तांमध्ये विशेषत: टियर 1 शहरांमध्ये राखीव किंमत कमी केली आहे. म्हणजेच टियर 1 शहरांमध्ये एअरलाइन्स कंपनी मालमत्ता खरेदीवर विशेष सवलत देईल. एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांने नाव न देण्याच्या अटीवर सांगितले की, या मालमत्तांमध्ये सुमारे 10 टक्के कपात करण्यात आली आहे.

टॅग्स :एअर इंडियाव्यवसायपैसा