AI Impact Summit : नवी दिल्ली येथे आयोजित AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये जगभरातील आघाडीचे टेक लीडर्स सहभागी झाले होते. या कार्यक्रमात Meta चे CEO मार्क झुकेरबर्ग प्रत्यक्ष उपस्थित नव्हते, मात्र त्यांच्या वतीने Meta Superintelligence Team चे प्रमुख अलेक्झांडर वांग यांनी प्रतिनिधित्व केले. विशेष म्हणजे, वांग हे जगातील सर्वात तरुण अब्जाधीशांपैकी एक आहेत.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
समिटच्या चौथ्या दिवशी मोठी हालचाल
समिटच्या चौथ्या दिवशी गुगलचे CEO सुंदर पिचाई, OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन, Anthropic चे CEO डारियो अमोडेई यांच्यासारख्या दिग्गजांची उपस्थिती होती. या सर्वांमध्ये अलेक्झांडर वांग यांचीही चर्चा झाली.
PM मोदींसोबत मंचावर...
२९ वर्षीय अलेक्झांडर वांग हे आज Meta ची AI आणि Superintelligence रणनीती लीड करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मंचावर दिसल्याने त्यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.
वांग यांची ओळख केवळ Meta मधील वरिष्ठ पदापुरती मर्यादित नाही. ते जगप्रसिद्ध AI कंपनी Scale AI चे संस्थापक राहिले आहेत. अतिशय कमी वयात त्यांनी AI डेटा क्षेत्रात मोठी कंपनी उभारली आणि नंतर Meta ने त्यांना आपल्या सर्वात महत्त्वाच्या AI मिशनची धुरा दिली.
AI क्षेत्रातील युवा अब्जाधीश...
MIT मधील शिक्षण अर्धवट सोडून 2016 मध्ये Scale AIची स्थापना करणाऱ्या वांग यांनी AI डेटा-लेबलिंग आणि मॉडेल ट्रेनिंगसाठी आवश्यक पायाभूत माहिती तयार करणारा व्यवसाय उभारला. NVIDIA, Amazon, Meta यांसारख्या कंपन्या Scale AI च्या क्लायंट्स होत्या.
कंपनी अल्पावधीतच Unicorn बनली
Forbesनुसार वांग यांची नेटवर्थ सुमारे $३.२-$३.६ अब्ज (₹२८,०००-₹३१,००० कोटी) असून, यासह ते जगातील सर्वात तरुण टेक अब्जाधीशांमध्ये गणले जातात.
Meta ने आपल्या ताफ्यात ओढले...
2025 मध्ये Meta ने Scale AI मध्ये सुमारे $१४.३ अब्ज (₹१.१७ लाख कोटी) गुंतवणूक करत कंपनीतील ४९% हिस्सा घेतला. याच व्यवहाराअंतर्गत वांग यांची Meta Superintelligence Labs (MSL) च्या प्रमुखपदी नियुक्ती झाली. ही डील AI इतिहासातील सर्वात मोठ्या टॅलेंट अक्विहायरपैकी एक मानली जाते. मार्क झुकेरबर्ग यांनीही याला Meta च्या AI रणनीतीसाठी ‘गेमचेंजर’ म्हटले होते.
भारताबाबत वांग यांचा दृष्टीकोन
AI इम्पॅक्ट समिटमध्ये PM मोदींसोबतची भेट ही केवळ औपचारिक नव्हती. Meta साठी भारत आता फक्त मोठा बाजार नसून AI चे पुढील जागतिक केंद्र ठरत आहे. वांग यांनी सांगितले की, भारतामध्ये AI स्वीकारण्याचा वेग अत्यंत जलद आहे. येथे लोक नवीन तंत्रज्ञान सहज स्वीकारतात. WhatsApp, Instagram आणि Facebook वरील AI फीचर्सचा सर्वाधिक वापर भारतात होत असल्याने, Meta भारताला AI साठी मोठे टेस्टिंग ग्राउंड मानते.
Superintelligence म्हणजे नेमकं काय?
आज आपण वापरत असलेले AI टूल्स (उदा. ChatGPT) हे मानवी बुद्धिमत्तेला मदत करणारे आहेत. Superintelligence म्हणजे असा AI जो, माणसाइतका नव्हे, तर माणसापेक्षा अधिक बुद्धिमान असेल. जलद शिकेल, अधिक अचूक निर्णय घेईल आणि अतिशय गुंतागुंतीच्या समस्या स्वतः सोडवेल. यामुळे औषधनिर्मिती, आरोग्यसेवा, हवामान बदल यांसारख्या क्षेत्रात मोठी क्रांती शक्य आहे. मात्र, सुरक्षा, नियंत्रण आणि गैरवापर याबाबत चिंता देखील व्यक्त केली जात आहे.
Web Summary : Alexander Wang, Meta's Superintelligence head and Scale AI founder, met PM Modi at the AI Impact Summit. Wang, a young billionaire dropout, sees India as a key AI testing ground due to its rapid tech adoption.
Web Summary : मेटा के सुपरइंटेलिजेंस प्रमुख और स्केल एआई के संस्थापक अलेक्जेंडर वांग ने एआई इम्पैक्ट समिट में पीएम मोदी से मुलाकात की। वांग, एक युवा अरबपति, भारत को तेजी से तकनीक अपनाने के कारण एक महत्वपूर्ण एआई परीक्षण स्थल के रूप में देखते हैं।