tesla hires : तुम्ही जर ऑटोमोबाईल क्षेत्रात काम करण्याची संधी शोधत असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्या टेस्लाने नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मस्क यांची टेस्ला कार लवकरच भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. आठवडाभरापूर्वी अमेरिकेत इलॉन मस्क यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाल्यानंतर आता टेस्लाने भारतातील कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. टेस्लाने त्यांच्या लिंक्डइन पेजवर १३ पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत.
टेस्ला आणि भारत यांच्यात बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. पण, उच्च आयात शुल्कामुळे कंपनीने भारतीय बाजारपेठेत अद्याप एन्ट्री केली नाही. आता भारत सरकारने २०,००० डॉलरपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवरील आयात शुल्क ११०% वरून ७०% पर्यंत कमी केले आहे, ज्यामुळे टेस्लाला देशात प्रवेश करण्याची मोठी संधी मिळाली आहे.
मुंबई, दिल्लीत होणार भरतीटेस्ला कंपनीने त्यांच्या लिंक्डइन पेजवर १३ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यामध्ये ग्राहक संबंधी आणि बॅक-एंड भूमिकांचा समावेश होता. एकूण पदांपैकी किमान पाच जागा सेवा तंत्रज्ञ आणि विविध सल्लागाराच्या रुपात आहेत. मुंबई आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणी ही भरती होणार आहे. तर, कस्टमर एंगेजमेंट मॅनेजर आणि डिलिव्हरी ऑपरेशन्स स्पेशलिस्ट सारख्या नोकऱ्या खास मुंबईत असणार आहे.
२०२४ मध्ये एक लाख ई-कारची विक्रीचीनच्या तुलनेत भारताची ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) बाजारपेठ अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे. परंतु, येथे वेगाने वाढणारी मागणी टेस्लासाठी फायदेशीर ठरू शकते. गेल्या वर्षी, भारतात सुमारे १,००,००० इलेक्ट्रिक कार विकल्या गेल्या, तर चीनमध्ये हा आकडा ११ दशलक्षांवर पोहोचला.
मोदी-मस्क यांची अमेरिकेत भेटनुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांची भेट घेतली. दोघांनी अनेक विषयांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर ट्रम्प यांनी खुलासा केला की भारतीय पंतप्रधानांनी अमेरिकेची व्यापार तूट कमी करण्यावर आणि लष्करी खरेदी वाढविण्यावर चर्चा केली आहे.