Join us

Gautam Adani: गौतम अदानींच्या झोळीत आणखी एक कंपनी, आता जगभरात विस्ताराची तयारी; १५ वर्ष जुनी आहे कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 08:31 IST

Gautam Adani News : हिंडेनबर्ग रिसर्चच्या धक्क्यातून बाहेर निघाल्यानंतर अदानी समूहानं पुन्हा एकदा झपाट्यानं विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. अदानी समूहाची कंपनी अदानी पोर्ट्सनं आणखी एक कंपनी खरेदी केली आहे.

Gautam Adani News : हिंडेनबर्ग रिसर्चच्या धक्क्यातून बाहेर निघाल्यानंतर अदानी समूहानं (Adani Group) पुन्हा एकदा झपाट्यानं विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. समूहातील कंपनी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनने (APSEZ) आणखी एका कंपनीचं अधिग्रहण केलंय. समूहानं जागतिक ओएसव्ही ऑपरेटर अ‍ॅस्ट्रो ऑफशोरमधील ८० टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी डेफिनिटिव्ह अॅग्रीमेंट केलंय. ही ऑल-कॅश डील १८५ मिलियन डॉलर्समध्ये करण्यात आली. 

अ‍ॅस्ट्रो ही आखाती देश, भारत, पूर्व आशिया आणि आफ्रिका या देशांमध्ये कार्यरत असलेली ऑफशोर सप्लाय व्हेसल ऑपरेटर आहे. कंपनीकडे २६ जहाजांचा ताफा आहे, ज्यात अँकर हँडलिंग टग्स आणि मल्टीपर्पज सपोर्ट वेसल्सचाही समावेश आहे. सोबतच कंपनी वेसल मॅनेजमेंट आणि त्याच्याशी संबंधित सेवा देखील पुरवते.

अ‍ॅस्ट्रोच्या ग्राहकांमध्ये एनएमडीसी, मॅकडरमॉट, COOEC, लार्सन अँड टुब्रो आणि Saipem यांचा समावेश आहे. सोबतच ही ऑफशोर कंस्ट्रक्शन अँड फॅब्रिकेशन आणि ऑफशोर ट्रान्सपोर्टेशन मार्केटमध्ये ही एक प्रमुख कंपनी आहे. "आम्हाला जगातील सर्वात मोठं मरीन ऑपरेटर बनायचं आहे आणि अ‍ॅस्ट्रोचं अधिग्रहण हा त्याचाच एक भाग आहे. अ‍ॅस्ट्रोमुळे आमचा ताफा वाढणार आहे. सध्या आमच्याकडे १४२ टग आणि ड्रेजर आहेत. यामुळे आमच्या ताफ्यातील जहाजांची एकूण संख्या १६८ वर जाईल," अशी प्रतिक्रिया अदानी पोर्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी गुप्ता यांनी दिली.

महिन्याभरात पूर्ण होणार डील

अ‍ॅस्ट्रोमुळे अरेबियन गल्फ, भारतीय उपखंड आणि पूर्व आशियातील आपलं स्थान मजबूत होईल, असंही गुप्ता म्हणाले. "गेल्या १५ वर्षांत कंपनीनं मोठी प्रगती केली आहे. या दरम्यान, आम्ही आमच्या ओएसव्ही ताफ्यात गुंतवणूक केली आणि आमच्या ग्राहकांशी संबंध विकसित केले. अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनसोबतची भागीदारी आमच्यासाठी महत्त्वाची आहे. दोन्ही कंपन्या मिळून आपला व्यवसाय जगभर पसरवू शकतात," असं अ‍ॅस्ट्रो ऑफशोरचे एमडी मार्क हम्फ्रीज यांनी सांगितलं. या करारासाठी कोणत्याही नियामक मंजुरीची आवश्यकता नाही आणि हा व्यवहार एका महिन्यात पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याचं अदानी पोर्ट्सनं म्हटलं.

टॅग्स :गौतम अदानीअदानीव्यवसाय