Join us

China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 14:42 IST

China Rare Earth Magnet: चीननं भारताला रेअर अर्थ मॅग्नेट्स देण्यास नकार दिलाय. यानंतर आता त्यांच्या उत्पादनाची व्यवस्था देशातच केली जात आहे.

China Rare Earth Magnet: चीननंभारताला रेअर अर्थ मॅग्नेट्स देण्यास नकार दिलाय. यानंतर आता त्यांच्या उत्पादनाची व्यवस्था देशातच केली जात आहे. मात्र, प्रत्यक्ष उत्पादनासाठी दोन वर्षे लागतील. दरम्यान, जपान आणि व्हिएतनामकडून रेअर अर्थ मॅग्नेट्स खरेदी करण्याचं काम सुरूये. इलेक्ट्रिक वाहनं आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये त्यांचा वापर केला जातो. रेअर अर्थ मॅग्नेट्सच्या देशांतर्गत उत्पादनासाठी अनुदान योजना सुरू करण्याबाबत १५ ते २० दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असं केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत अनुदानाचे प्रमाण निश्चित करण्यासाठी भागधारकांशी चर्चाही सुरू असल्याचं ते म्हणाले.

जर एकूण प्रोत्साहन एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल तर ही योजना केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठविली जाईल. हैदराबादची एक कंपनी यात रस दाखवत आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत ५०० टन पुरवठा करण्याचं त्यांनी आश्वासन दिलंय. आम्ही खाण मंत्र्यांशी चर्चा केली आहे. आमचे सचिव आणि आमचं मंत्रालय यावर काम करत आहेत. १५ ते २० दिवसांत निर्णय होईल, असं मला वाटतं, अशी प्रतिक्रिया अवजड उद्योग मंत्रालयाचे सचिव कामरान रिझवी यांनी दिली.

दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा

चीनचे निर्बंध

चीनने अलीकडेच महत्त्वाच्या धातूंच्या निर्यातीवर घातलेल्या निर्बंधांमुळे भारतासह अनेक देशांमध्ये ऑटोमोबाइल आणि सेमीकंडक्टर चिप उत्पादनात मोठ्या प्रमाणात व्यत्यय आला आहे. दुर्मिळ खनिजाच्या प्रत्यक्ष उत्पादनासाठी सुमारे दोन वर्षे लागतील, असं सचिवांनी सांगितलं. या दरम्यान, जपान आणि व्हिएतनामसह पर्यायी स्त्रोतांकडून सोर्सिंगची शक्यता शोधण्यासाठी सरकार उद्योगासोबत काम करेल. जपान आणि व्हिएतनाममध्ये दुर्मिळ खनिजं उपलब्ध आहेत, तेथून ते घेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं.

रेअर अर्थ मॅग्नेटमध्ये निओडिमियम-लोह-बोरॉन यांचा समावेश आहे. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये ट्रॅक्शन मोटर आणि इलेक्ट्रिक वाहनं आणि पारंपारिक वाहनांमध्ये पॉवर स्टीअरिंग मोटरसाठी याचा वापर केला जातो. या अनुदानामुळे रेअर अर्थ ऑक्साईडचे मॅग्नेटमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रक्रिया सुविधा उभारण्यासाठी गुंतवणूक सुलभ होईल. अणुऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या इंडियन रेअर अर्थ मॅग्नेट लिमिटेड या सार्वजनिक उपक्रमाकडे रेअर अर्थ मॅग्नेटचा साठा आहे. कंपनीकडे १५०० टन चुंबक तयार करण्यासाठी पुरेसे रेअर एलिमेंट्स आहेत.

टॅग्स :भारतचीनशी जिनपिंग