Smartphone Manufacture : उत्पादन क्षेत्रात भारत दिवसेंदिवस चीनला टक्क देत आहे. गेल्यावर्षी स्मार्टफोनमधील दिग्गज कंपनी अॅपलने आपला आयफोनची निर्मिती भारतात सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या 'मेक इन इंडिया' उपक्रमाला आणखी एक यश मिळाले आहे. आघाडीची टेक कंपनी लेनोवोने येत्या ३ वर्षात भारतात पर्सनल कॉम्प्युटर मॉडेल्स तयार करण्याची योजना जाहीर केली आहे. लेनोवो भारतात निर्मित मोटोरोलास्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत निर्यात करत आहे. कंपनीने म्हटले आहे की मोटोरोलाचे सर्व फोन आता भारतात तयार केले जातील. शेजारी राष्ट्र चीनला हा मोठा धक्का आहे.
लेनोवो इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र कटियाल म्हणाले की, सध्या देशातील कंपनीच्या संगणक विक्रीपैकी ३० टक्के विक्री स्थानिक पातळीवर केली जाते. ते पुढे म्हणाले, "पुढील वर्षी हा आकडा ५० टक्के आणि पुढील ३ वर्षांत १०० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो." कटियाल यांनी असेही सांगितले की लेनोवोचे पहिले एआय-शक्तीवर चालणारे सर्व्हर १ एप्रिलपासून भारतातील त्याच्या उत्पादन केंद्रात तयार करणे सुरू होईल. मुंबईत 'लेनोवो टेकवर्ल्ड इंडिया २०२५' मध्ये ते बोलत होते.
गेल्या वर्षी भारतात उत्पादन सुरूगेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, लेनोवोने पुडुचेरीमध्ये एक उत्पादन कारखाना उघडला. या कंपनीत दरवर्षी सुमारे ५०,००० एंटरप्राइझ AI सर्व्हर आणि २,४०० हाय-एंड ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट तयार करू शकतो. कंपनी देशात आपली संशोधन आणि विकास क्षमता वाढवत आहे. कंपनी बेंगळुरूमध्ये आणखी एक संशोधन आणि विकास केंद्र स्थापन करण्याची योजना आखत आहे.
लेनोवोचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे अध्यक्ष मॅथ्यू झीलिन्स्की यांनी कंपनीसाठी भारताचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. “भारत ही जगातील सर्वात महत्त्वाच्या बाजारपेठांपैकी एक असल्याचेही त्यांनी म्हटले. “भारतातील आमचे उत्पादन युनिट केवळ भारतासाठीच उत्पादन करत नाही, तर भारताला एक प्रमुख निर्यातदार म्हणून स्थान देत असल्याचेही झीलिन्स्की यांनी स्पष्ट केलं.
चीनसमोर मोठं आव्हानकधीकाळी चीनशिवाय जगाचं पानही हलत नव्हतं. अजूनही उत्पादनात चीन आघाडीवर आहे. मात्र, अलीकडच्या काळात अनेक दिग्गज कंपन्यानी भारताकडे आपला मोर्चा वळवायला सुरुवाता केली आहे. भारत जगासमोर नवीन उत्पादन केंद्र म्हणून समोर येत आहे.