Join us

आता व्हॉटस्अ‍ॅप’वरही झळकणार जाहिराती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 07:11 IST

आता सर्वसामान्य लोकांसाठी व्हॉटस्अ‍ॅप ‘अ‍ॅडस् आॅन’ हे नवीन फिचर सुरू करणार आहे. व्हॉटस्अ‍ॅपवर जाहिरातींची सुरुवात २०१९ पासून सुरू होण्याची दाट शक्यता आहे. 

नवी दिल्ली : आजवर जाहिरातींपासून अलिप्त असलेले व्हॉटस्अ‍ॅप फेसबुकच्या मालकीचे झाल्यापासून ग्राहकांसाठी सर्वोत्तम संपर्क आणि संदेश सेवा देण्यासाठी नवनवीन फिचर्स सुरू करण्यात येत आहेत. आता कमाईसाठी नवीन पर्यायही शोधत आहेत. आता सर्वसामान्य लोकांसाठी व्हॉटस्अ‍ॅप ‘अ‍ॅडस् आॅन’ हे नवीन फिचर सुरू करणार आहे.व्हॉटस्अ‍ॅपवर जाहिरातींची सुरुवात २०१९ पासून सुरू होण्याची दाट शक्यता आहे. या फिचरमुळे तुम्हाला स्टेटस सेक्शनवर जाहिराती दिसतील, असे व्हॉटस्अ‍ॅपचे उपाध्यक्ष ख्रिस डॅनियल्स यांनी बुधवारी सांगितले. व्हॉटस्अ‍ॅप स्टेटसवर दिसणारी जाहिरात व्हिडिओ स्वरुपात असेल.

टॅग्स :व्हॉट्सअॅप