Join us

२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 16:01 IST

Aditya Vision Stock Price: शेअर्सनी गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना २०,४८३% परतावा दिला आहे. जर तुम्ही पाच वर्षांपूर्वी या कंपनीत १ लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची किंमत २ कोटी रुपये झाली असती.

Aditya Vision Stock Price: पाटणा येथील कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर आदित्य व्हिजनच्या शेअर्सनी गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना २०,४८३% परतावा दिला आहे. जर तुम्ही पाच वर्षांपूर्वी या कंपनीत १ लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची किंमत २ कोटी रुपये झाली असती. सोमवारी कंपनीचे शेअर्स ८% पेक्षा जास्त वाढून ४२४ रुपयांवर पोहोचले. ब्रोकरेजचं म्हणणे आहे की २२% वाढीसह कंपनीचा शेअर ५५० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.

या वर्षी प्रॉफिट बुकिंग आणि कमकुवत ग्राहक भावनांमुळे आदित्य व्हिजनचे शेअर्स १८ टक्क्यांनी घसरले आहेत. परंतु पहिल्या तिमाहीच्या निकालांनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा वाढ दिसून येत आहे. कंपनी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन विकते. उद्योगात मंदी असूनही, कंपनीनं चांगली कामगिरी केली आहे. एमके ग्लोबलचे देवांशू बन्सल यांनी कंपनीचे शेअर्स अ‍ॅड टू बाय वरून अपग्रेड केले आहेत आणि त्यांची टार्गेट प्राईज ५५० रुपयांपर्यंत वाढवली आहे.

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी तेजी, खरेदीपूर्वी जाणून घ्या नवे दर?

कंपनीची कामगिरी

पहिल्या तिमाहीत, ड्युरेबल गुड्स उत्पादक कंपन्यांच्या महसुलात १५ ते ३० टक्क्यांनी घट झाली, परंतु आदित्य व्हिजनच्या महसुलात ६ टक्क्यांनी वाढ झाली. हे अंदाजापेक्षा दोन टक्के जास्त होते. अवकाळी पाऊस आणि कमकुवत मागणीमुळे, कंपनीच्या त्याच स्टोअर विक्रीतील वाढ ४ टक्के नकारात्मक होती. परंतु सणासुदीच्या हंगामात कंपनीला ती सकारात्मक होण्याची आशा आहे.

ही कंपनी झारखंडमधील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर आहे. बिहारमध्येही कंपनीचा बाजारपेठेतील वाटा ५०% पेक्षा जास्त आहे. कंपनीचं व्यवसाय मॉडेल या राज्यांमध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये "क्लस्टर-आधारित" विस्तारावर आधारित आहे. कंपनी तिची ८५% उत्पादनं थेट १०० हून अधिक ब्रँड्सकडू घेते. यामुळे कंपनीला खाजगी लेबल्स न वापरता अधिक नफा मिळतो.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक