Join us
Daily Top 2Weekly Top 5

Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 11:50 IST

बॉलिवूडमध्ये आदित्य धर हे नाव सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर २’ सारख्या दोन मोठ्या चित्रपटांच्या यशानं त्यांना बॉलिवूडमधील आघाडीच्या दिग्दर्शकांमध्ये स्थान मिळवून दिलंय.

बॉलिवूडमध्ये आदित्य धर हे नाव सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर २’ सारख्या दोन मोठ्या चित्रपटांच्या यशानं त्यांना बॉलिवूडमधील आघाडीच्या दिग्दर्शकांमध्ये स्थान मिळवून दिलंय. यापूर्वी त्यांच्या ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवलं होतं, ज्यामुळे त्यांना खरी ओळख मिळाली.

कोट्यवधींचं नेटवर्थ

आदित्य धर आणि त्यांची पत्नी यामी गौतम यांची एकूण संपत्ती १०० कोटी रुपयांहून अधिक असल्याचं सांगण्यात येत आहे. दोघांनीही आपापल्या करिअरमध्ये हळूहळू यश संपादन केलं असून आज ते एका मजबूत आर्थिक स्थितीत आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त निर्मितीच्या (Production) माध्यमातूनही त्यांनी कमाईचे नवे मार्ग तयार केले आहेत.

आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर

लक्झरी घरं आणि शानदार प्रॉपर्टी

या दांपत्याकडे मुंबईतील वांद्रे भागात एक आलिशान अपार्टमेंट आहे, जिथे ते आपल्या मुलासह राहतात. याशिवाय चंदिगडमध्ये एक डुप्लेक्स आणि हिमाचल प्रदेशातील गोहरमध्ये २५ एकरची हेरिटेज इस्टेट देखील त्यांच्या मालकीची आहे. याच इस्टेटमध्ये या दोघांचा विवाह झाला होता, जो त्यांच्या खास आठवणींशी जोडलेला आहे.

महाड्या गाड्यांचे शानदार कलेक्शन

आदित्य आणि यामी यांच्याकडे अनेक लक्झरी कार आहेत. यामध्ये BMW X7, ऑडी Q7 आणि ऑडी A4 सारख्या गाड्यांचा समावेश आहे. BMW X7 ची किंमत १ कोटी रुपयांपेक्षा जास्त असून त्यात अनेक आधुनिक फीचर्स आहेत, जी या कारला खास बनवतात.

आदित्य धर त्यांच्या 'B62 Studios' या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून अनेक चित्रपटांची निर्मिती करत आहेत. त्यांच्या चित्रपटांमध्ये काश्मीरमधील कथा आणि ऐतिहासिक घटनांना विशेष स्थान मिळतं, ज्यामुळे त्यांच्या चित्रपटांना एक वेगळी ओळख मिळाली आहे. सततच्या कामानंतर आता आदित्य थोडा काळ विश्रांती घेण्याचा विचार करत आहेत. त्यानंतर ते नवीन प्रोजेक्ट्सवर काम सुरू करतील, ज्यामध्ये 'The Immortal Ashwatthama', चंद्रगुप्त मौर्य यांच्यावर आधारित चित्रपट किंवा एखादा स्पोर्ट्स ड्रामा यांचा समावेश असू शकतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Aditya Dhar Net Worth: Director's Property from Mumbai to Himachal

Web Summary : Director Aditya Dhar, known for 'Uri' and 'Dhurandhar', boasts a net worth exceeding ₹100 crore with his wife, Yami Gautam. Their assets include a Mumbai apartment, Chandigarh duplex, and a Himachal estate. They own luxury cars like BMW X7 and Audi Q7. Dhar's production house, B62 Studios, focuses on Kashmiri stories.
टॅग्स :यामी गौतमधुरंधर सिनेमा