Join us  

अदानी ग्रुपचा 33 रुपयांचा शेअर आज 700 पार; 4 वर्षांत एका लाखाचे झाले 21 लाख...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 2:47 PM

पहिल्यांदाच अदानी ग्रुपच्या या शेअरने 700 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

Adani Power Stock : गेल्या दोन दिवसांपासून शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत अदानी ग्रुपचे शेअर्स (Adani Group Share) मात्र तेजीत आहेत. काल अदानी ग्रुपच्या सर्व शेअर्समध्ये तेजी होती, मात्र आज अदानी विल्मर, पोर्ट्स आणि एंटरप्रायझेस वगळता इतर सर्व शेअर्स वाढले. यादरम्यान अदानी पॉवरच्या (Adani Power) शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. काल 9 टक्क्यांच्या वाढीनंतर आज (बुधवार) अदानी पॉवरचा शेअर सुमारे 4 टक्क्यांनी वाढून 715.60 रुपयांवर पोहोचला. 

विशेष म्हणजे, अदानी पॉवर पहिल्यांदाच 700 च्या पातळीवर पोहचला आहे. या वाढीनंतर अदानी पॉवरचे मार्केट कॅप 2.6 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे या कंपनीत पैसे गुंतवणाऱ्यांना बंपर फायदा झाला आहे. गेल्या सहा महिन्यांत या शेअरने 80.35% परतावा दिला आहे, तर जानेवारीपासून आतापर्यंत या शेअरमध्ये 34 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, अवघ्या एका वर्षात या स्टॉकने 182 टक्के परतावा दिला आहे.

शेअर 30 रुपयांवरून 700 वर गेला 4 वर्षांपूर्वी, म्हणजे मे 2020 मध्ये अदानी पॉवरचे शेअर्स 33 रुपयांवर होते. तेव्हापासून आतापर्यंत या शेअरमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आज अदानी पॉवरचा शेअर 700 रुपयांच्या पुढे गेला आहे. या चार वर्षांच्या कालावधीत स्टॉकने 2025 टक्के परतावा दिला आहे. म्हणजेच, चार वर्षांपूर्वी या शेअरमध्ये जर एखाद्याने 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर आज त्याचे 21 लाख रुपये मिळतील. 

(टीप- शेअर बाजार जोखमीच्या अधीन आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारअदानीगौतम अदानी