गौतम अदानी समूह आणि टाटा समूहाच्या पॉवर कंपन्यांनी डिसेंबर तिमाहीचे निकाल नुकतेच जाहीर केले. या निकालांनंतर, विविध ब्रोकरेजने दोन्ही कंपन्यांच्या शेअर्ससाठी टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. यांत अदानी पॉवरच्या शेअरला अधिक पसंती दिल्याचे दिसून येते.
अदानी पॉवर शेअर -अदानी पॉवरचे शेअर्स सध्या तेजीत आहेत. हा शेअर शुक्रवारी बीएसईवर ₹१५२.६५ वर व्यवहार करत होता. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी ५२ आठवड्यांच्या नीचांकी ₹९३.२३ पासून हा स्टॉक ६५% वाढला आहे. हा स्टॉक अल्पकालीन आणि दीर्घकालीन मूव्हिंग अॅव्हरेजपेक्षाही वर व्यवहार करत आहे. जेएम फायनान्शियलने अदानी ग्रुपच्या या स्टॉकवर किंमत लक्ष्य ₹१७७ ठेवले आहे. मॉर्गन स्टॅनलीने ₹१८५ ची टार्गेट प्राइस ठेवत अदानी पॉवरवर ओव्हरवेट रेटिंग कायम ठेवला आहे.
ऑपरेशनल कामगिरी मोठ्या प्रमाणात अपेक्षेनुसार होती, असे जागतिक ब्रोकरेजने म्हटले आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजने स्टॉकवर ₹१८७ एवढी टार्गेट प्राइस ठेवली आहे. याशिवाय, देशांतर्गत ब्रोकरेजने म्हटले आहे की, अदानीने आपले वाद सोडवले असून कर्जही कमी केले आहे. कंपनीचा ऑपरेटिंग मालमत्तेचा नफा वाढवला आहे. ते आपल्या बॅलेन्स शीटचा वापर, मालमत्ता खरेदी करण्यासाठी करत आहेत. कोळशाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी ते नवीन मालमत्तांमध्ये गुंतवणूकही करत आहेत.
टाटा पॉवर शेअर -टाटा पॉवरच्या शेअर्सचा विचार करता, या शेअरने गेल्या दोन वर्षांत कोणताही सकारात्मक परतावा दिलेला नाही, दोन आठवड्यात ५.३१% परतावा वगळता. सध्या, टाटा पॉवरचे शेअर्स ३६४.८५ रुपयांवर व्यवहार करत आहेत. ब्रोकरेज नुवामाने टाटा पॉवरवर ३८८ रुपयांची टार्गेट प्राइस ठेवली आहे. एलाराने स्टॉकसाठी ५०४ रुपयांची टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. तर, जेएम फायनान्शियलने टाटा पॉवरच्या शेअरवर ४२९ रुपयांची टार्गेट प्राइस ठेवली आहे. जी आधी ४७५ रुपयांपेक्षा अधिक होती.(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
Web Summary : Brokerages favor Adani Power after recent results. Adani's stock is rising with positive ratings and price targets. Tata Power's returns have been flat; brokerages suggest price targets but with varied outlooks. Consult experts before investing.
Web Summary : हालिया नतीजों के बाद ब्रोकरेज अडानी पावर को पसंद कर रहे हैं। अडानी के शेयर सकारात्मक रेटिंग और मूल्य लक्ष्यों के साथ बढ़ रहे हैं। टाटा पावर का रिटर्न स्थिर रहा है; ब्रोकरेज मूल्य लक्ष्य सुझाते हैं लेकिन अलग-अलग दृष्टिकोण के साथ। निवेश से पहले विशेषज्ञों से सलाह लें।