Join us

मीडिया सेक्टरमध्ये अदानी समूहाची मोठी डील, खरेदी केली कंपनीची संपूर्ण हिस्सेदारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 15:34 IST

अदानी एंटरप्रायजेस लिमिटेडने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, तिची उपकंपनी असलेल्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडने QBML मधील उर्वरित 51 टक्के हिस्सा घेण्यासाठी एक शेअर खरेदी करून डील पूर्ण केली.

उद्योगपती गौतम अदानी यांच्या समूहाने क्विंटिलियन बिझनेस मीडिया प्रायव्हेट लिमिटेडमधील उर्वरित 51 टक्के हिस्सेदारीही विकत घेतले आहे. मात्र अद्याप, कंपनीने आर्थिक देवाण घेवाणीचा खुलासा केलेला नाही. अदानी एंटरप्रायजेस लिमिटेडने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, तिची उपकंपनी असलेल्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडने QBML मधील उर्वरित 51 टक्के हिस्सा घेण्यासाठी एक शेअर खरेदी करून डील पूर्ण केली आहे.

अशी आहे डिटेल -QBML व्यापार आणि अर्थ विषयक बातम्या देणारा बीक्यू प्राइम हा डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म चालवते. यापूर्वी एएमजी मीडियाने क्विंटिलियन बिझनेस मीडिया लिमिटेडमध्ये 47.84 कोटी रुपयांत 49 टक्क्यांची हिस्सेदारी खरेदी केली होती. 

बीक्यू प्राइमला आधी ब्लूमबर्ग क्विंट नावाने ओळखले जात होते. जो अमेरिकेतील आर्थिक विषयक बातम्या देणारी संस्था ब्लूमबर्ग मीडिया आणि राघव बहल यांच्या क्विंटिलियन मीडियाचा संयुक्त उपक्रम होता. मात्र, ब्लूमबर्ग गेल्या वर्ष मार्च महिन्यातच या करारापासून दूर झाला होता.

कंपनीचा शेअर -आज Quint Digital Ltd चा शेअर किंचित वाढीसह 157.10 रुपयांवर ट्रेड करत आहे. तसेच, या महिन्यात हा शेअर 3.32% कोसळला आहे.  

टॅग्स :गौतम अदानीअदानीव्यवसायमाध्यमे