Join us  

अदानी ग्रुपची मोठी झेप अन् LIC ला वर्षभरात झाला 22,378 कोटींची बंपर फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 6:14 PM

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ने अदानी ग्रुपमध्ये केलेल्या गुंतवणूकीवर दमदार नफा मिळवला आहे.

Adani-LIC : गेल्या वर्षी हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्टमुळे गौतम अदानी यांना मोठा तोटा हसन करावा लागला. या रिपोर्टमुळे अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण झाली. त्यावेळी देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC खूप चर्चेत आली होती. अदानी ग्रुपमधील गुंतवणुकीमुळे एलआयसीला मोठे नुकसान सहन करावे लागले होते. विरोधी पक्षांनी यावरुन सरकारला धारेवर धरले. पण आता हिंडेनबर्ग रिपोर्टचा प्रभाव संपला आहे. हळुहळू अदानी ग्रुपच्या शेअर्समध्येही वाढ होत आहे. यामुळेच गेल्या वर्षभरात एलआयसीच्या कमाईत 22 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 

LIC ला किती फायदा झाला?LIC ने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या मूल्यात 59 टक्के नफा नोंदवला आहे. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, अदानी समूहाच्या सात कंपन्यांमध्ये एलआयसीची एकूण गुंतवणूक 31 मार्च 2023 रोजी 38,471 कोटी रुपयांवरुन 31 मार्च 2024 रोजी 61,210 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. म्हणजेच, यामध्ये 22,378 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 

गुंतवणूक कमी करुनही नफा मिळवलाराजकीय दबावामुळे एलआयसीने अदानी पोर्ट्स आणि अदानी एंटरप्रायझेसमधील आपली गुंतवणूक कमी केली होती. या दोन कंपन्यांच्या शेअर्समध्ये अनुक्रमे 83 टक्के आणि 68.4 टक्के वाढ झाली. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, गुंतवणूक कमी करुनही एलआयसीने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये अदानी समूहातील गुंतवणुकीवर 59 टक्के नफा कमावला. 

कोणत्या कंपनीकडून किती नफा?LIC ची अदानी एंटरप्राइज लिमिटेडमधील गुंतवणूक 31 मार्च 2023 रोजी 8,495.31 कोटी रुपयांवरुन 31 मार्च 2024 रोजी 14,305.53 कोटी रुपयांपर्यंत वाढली. या कालावधीत अदानी पोर्ट्समधील गुंतवणूक रु. 12,450.09 कोटींवरून, रु. 22,776.89 कोटी झाली. तर, LIC ची अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडमधील गुंतवणूक एका वर्षात दुपटीने वाढून रु. 3,937.62 कोटी झाली आहे.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारएलआयसीअदानी