Join us

Adani Group: अदानींमुळे रेल्वेने कमवले 14,000 कोटी; अदानी पोर्ट्सचा रेल कार्गो हँडलिंगमध्ये नवा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 13:36 IST

अदानी समूहातील कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये मोठी कमाई केली आहे.

नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून गौतम अदानी चर्चेत आहेत. हिंडनबर्गच्या रिपोर्टमुळे अदानींची संपत्ती निम्म्याहून अर्धी झाली. पण, आता ते हळुहळू यातून सावरत आहेत. यातच आता अदानी समूहातील कंपनी (Adani Group) अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) ने एक नवा विक्रम रचला आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 120.51 MMT रेल्वे कार्गो हाताळले आहे, जे मागील आर्थिक वर्षातील 98.61 MMT पेक्षा 22.2% जास्त आहे.

रेल्वेने कमावले 14,000 कोटी भारतीय रेल्वेच्या जनरल पर्पज वॅगन इन्व्हेस्टमेंट स्कीम (GPWIS) अंतर्गत-अदानी पोर्ट्सने जारी केलेल्या मीडिया रिलीझनुसार, रेल्वेद्वारे हाताळल्या जाणार्‍या कार्गोमध्ये वार्षिक 62% वाढ नोंदवली गेली आहे. मुंद्रा पोर्टने FY23 मध्ये 15,000 हून अधिक कंटेनर ट्रेन्स हाताळल्या आणि भारताचे EXIM (निर्यात आयात) गेटवे म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे.

मीडिया रिलीजनुसार - आर्थिक वर्ष 2023 मध्ये, APSEZ भारतीय रेल्वेसाठी रेल्वे कार्गोमधून सुमारे 14,000 कोटी रुपयांचा महसूल मिळवला. आर्थिक वर्ष-2023 मध्ये मुंद्रा बंदराद्वारे चालवल्या जाणार्‍या डबल-स्टॅक कंटेनर ट्रेनमध्ये 4.3% ची वाढ नोंदवली गेली आहे.

डबल स्टॅक लोडिंगचा फायदाकंपनीने जारी केलेल्या प्रेस रिलीझमध्ये असे म्हटले आहे की, ट्रेन्सवरील कंटेनरचे डबल स्टॅक लोडिंग ऊर्जा कार्यक्षम आणि विश्वासार्ह पद्धतीने वाहतूक सुनिश्चित करते, एकूण प्रति युनिट खर्च कमी करते आणि यामुळेच ग्राहकांचे समाधान होते. रेल्वे वाहतुकीच्या वापरामुळे मालवाहतुकीचा कार्बन फूटप्रिंट कमी होतो आणि कंटेनर ट्रेनच्या कार्यक्षमतेमुळे अतिरिक्त ट्रक वाहतुकीची गरज कमी होते. त्यामुळे कार्बन उत्सर्जनदेखील कमी होते.

टॅग्स :गौतम अदानीभारतीय रेल्वेअदानीव्यवसायगुंतवणूक