Join us

अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 11:18 IST

adani green : उद्योगपती गौतम अदानी यांच्या अमेरिकेतील कंपनी अदानी ग्रीन कंपनीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

adani green : देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांना अमेरिकेतून आनंदाची बातमी आली आहे. अमेरिकेत अदानी समूहाविरुद्ध सुरू असलेल्या लाचखोरी प्रकरणात एक मोठी अपडेट आली आहे. अदानी ग्रुपने स्वतः याबाबत माहिती दिली आहे. अमेरिकेत त्यांच्याविरुद्धच्या आरोपांच्या स्वतंत्र तपासात कोणतीही अनियमितता आढळली नाही, असे ग्रुपने म्हटले आहे. अदानी ग्रुपची कंपनी अदानी ग्रीनवर अमेरिकेतील अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप होता. आता या प्रकरणात त्यांना क्लिन चीट मिळाली आहे.

अदानी ग्रीन काय आरोप आहेत?गौतम अदानी, त्यांचा पुतण्या आणि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विनीत जैन यांच्यावर अमेरिकेतील अधिकाऱ्यांना वीज उत्पादनांसाठी लाच दिल्याचा आरोप होता. या ग्रुपवर अधिकाऱ्यांना २ कोटी ३६ लाख डॉलर्सची लाच दिल्याचा आरोप होता. या प्रकरणाच्या स्वतंत्र तपासणीत या आरोपांमध्ये तथ्य आढळले नसल्याचे अदानी ग्रुपने म्हटले आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये, अमेरिकन अधिकाऱ्यांनी गौतम अदानी, त्यांचा पुतण्या आणि कार्यकारी संचालक सागर अदानी आणि व्यवस्थापकीय संचालक विनीत एस जैन यांच्यावर भारतीय वीज करार मिळवण्यासाठी लाच दिल्याचा आणि निधी उभारताना अमेरिकन गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा आरोप केला होता. अदानी समूहाने हे आरोप फेटाळून लावले असून ते निराधार असल्याचे म्हटले होते.

खटला लढण्यासाठी अदानी ग्रुपकडून वकिलांची फौजअदानी समूहाने जानेवारीमध्ये या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी एका स्वतंत्र कायदा फर्मची नियुक्ती केली होती. कंपनीने आपल्या फायलिंगमध्ये म्हटले होते की, रिव्यूच्या आधारे, आम्ही आणि आमच्या भागीदार कंपन्या नियम आणि कायदे पाळत राहू असा निर्णय घेतला आहे. तसेच, आम्हाला आशा आहे की या आरोपांचा कंपनीवर फारसा परिणाम होणार नाही. दरम्यान, फेब्रुवारी २०२५ मध्ये, अमेरिकन बाजार नियामकाने समूहावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांकडून सहकार्य मागितले होते.

वाचा - सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड

विनीत जैन यांचा कार्यकाळ वाढवलाकंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विनीत जैन यांच्यावरील आरोपांच्या पार्श्वभूमीवर अदानी ग्रीनने १० जुलै रोजी त्यांची ५ वर्षांच्या कालावधीसाठी संचालकपदी पुन्हा नियुक्ती केली. कंपनीने म्हटले आहे की जैन यांनी त्यांच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात उत्कृष्ट काम केले आहे. त्यांनी कंपनीला ऊर्जा क्षेत्रात नवीन उंचीवर नेले आहे.

टॅग्स :गौतम अदानीअदानीअमेरिकाडोनाल्ड ट्रम्प