Business Success Story: आज आम्ही तुम्हाला ९० च्या दशकातील अशा एका अभिनेत्याच्या यशाची कहाणी सांगणार आहोत, जो एका चित्रपटामुळे रातोरात सुपरस्टार बनला. यानंतरही त्यानं काही हिट चित्रपट दिले, पण त्याला अपेक्षित असलेलं यश मिळालं नाही. आम्ही सांगत आहोत अभिनेते राजेंद्र कुमार यांचे पुत्र आणि अभिनेते संजय दत्त यांचे मेहुणे कुमार गौरव यांच्याबद्दल. ते वडिलांसारखे पडद्यावर यशस्वी होऊ शकले नाहीत, पण त्यांनी व्यवसायाच्या क्षेत्रात यशाची नवी कहाणी लिहिली.
बिझनेस क्षेत्रात यश
बॉलिवूडमध्ये जेव्हा स्थान मिळत नाही, तेव्हा अनेक जण अज्ञात जीवन जगू लागतात. काहीजण आपल्या गाव-शहरात परत जातात, तर काही असे असतात जे हार न मानता व्यवसायात आपलं नाव मोठं करतात. कुमार गौरव देखील अशाच अभिनेत्यांच्या यादीत सामील आहेत. आज ते भलेही लाइमलाइटपासून दूर राहतात, पण त्यांचे काही चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत.
३० नोव्हेंबरपर्यंत करुन घ्या हे महत्त्वाचं काम; अन्यथा अडकेल तुमचं पेन्शन, पटापट पाहा डिटेल्स
करिअरची सुरुवात
अभिनेत्यापासून व्यावसायिक बनलेल्या कुमार गौरव यांनी आपल्या करिअरची सुरुवात १९८१ मध्ये चित्रपटसृष्टीत केली होती. त्यांचे वडील 'मदर इंडिया', 'आरजू' सारख्या चित्रपटांमध्ये काम करून यशस्वी झाले होते. लहानपणापासून वडिलांना अभिनय करताना पाहिल्यामुळे त्यांना त्याच वाटेवर जायचं होतं. त्यांनी त्यासाठी खूप प्रयत्न केले, काही हिट चित्रपटही दिले, पण त्यांना वडिलांसारखं मोठं यश मिळालं नाही. विशेष म्हणजे, त्यांचा पहिला चित्रपट 'लव स्टोरी' त्यांच्या वडिलांनी, राजेंद्र कुमार तुली यांनीच निर्मित केला होता, ज्याला प्रेक्षकांनी खूप पसंत केलं.
संजय दत्तच्या बहिणीसोबत विवाह
कुमार गौरव यांचा विवाह अभिनेता संजय दत्त याची बहीण नम्रता दत्त हिच्याशी झाला आहे. त्यांचे भाचे गोल्डी बहल हे अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांचे पती आहेत. कुमार गौरव यांनी 'स्टार', 'तेरी कसम', 'हम है लाजवाब', 'लव्हर्स रोमांस', 'एक से भले दो' आणि 'ऑल राउंडर' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. २००२ मध्ये आलेल्या 'काँटे' चित्रपटानंतर आलेल्या अपयशामुळे ते चित्रपटांपासून दूर झाले.
व्यवसायात जम बसवला
कुमार गौरव यांच्या अभिनयाची जादू चालली नसली तरी, त्यांची व्यावसायिक बुद्धी त्यांना यशाच्या शिखरावर घेऊन गेली आहे. ते मालदीवमध्ये ट्रॅव्हलिंगसोबतच बांधकाम (Construction) व्यवसायात कार्यरत आहेत. या व्यवसायातून त्यांना कोट्यवधी रुपयांची कमाई होते. याव्यतिरिक्त, त्यांनी अनेक ठिकाणी गुंतवणूक देखील केली आहे, जिथून त्यांना चांगलं उत्पन्न मिळतं. त्यांचं नेटवर्थ ७५ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं.
Web Summary : Kumar Gaurav, despite early film success, transitioned to business after Bollywood. He's now thriving in Maldives' travel and construction, with a net worth around ₹75 crores. A true success story.
Web Summary : शुरुआती फिल्मी सफलता के बावजूद, कुमार गौरव ने बॉलीवुड के बाद व्यवसाय में कदम रखा। अब वे मालदीव के ट्रैवल और कंस्ट्रक्शन में फल-फूल रहे हैं, जिनकी कुल संपत्ति लगभग 75 करोड़ रुपये है।