Join us

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 15:04 IST

Accenture Layoffs : आयटी कन्सल्टिंग फर्मने गेल्या तीन महिन्यांत ११,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

Accenture Layoffs : आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयमुळे जागतिक टेक्नॉलॉजी आणि कन्सल्टिंग क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. याचा सर्वात मोठा परिणाम मनुष्यबळावर होत आहे. गुगलपासून मेटापर्यंत अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना काढून टाकलं जात आहे. यामध्ये आणखी एका कंपनीचा समावेश झाला आहे. या बदलांचा थेट परिणाम आता ग्लोबल कन्सल्टिंग फर्म एक्स्चेंचर वर दिसून आला आहे. कंपनीने जगभरातील ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.

कंपन्या त्यांच्या कामाकाजाची पद्धत बदलून एआय तंत्रज्ञान वेगाने स्वीकारत आहेत, ज्यामुळे मनुष्यबळाची गरज कमी झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत एक्स्चेंचरने इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.

कर्मचाऱ्यांनी 'रीस्किल' न केल्यास आणखी कपात'टाइम्स ऑफ इंडिया'च्या अहवालानुसार, टेक्नॉलॉजी आणि कन्सल्टिंग उद्योगात एआयमुळे मोठ्या प्रमाणावर कपात होत आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की, जर कर्मचाऱ्यांनी स्वतःला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या गरजेनुसार 'रीस्किल' केले नाही, तर भविष्यात आणखी कर्मचारी कामावरून काढले जाऊ शकतात. सीईओ जूली स्वीट यांनी या निर्णयाचे समर्थन करताना सांगितले की, "तंत्रज्ञानात बदल होत असताना कर्मचाऱ्यांचे ट्रेनिंग करणे आणि नवीन प्रणाली स्वीकारणे आवश्यक असते."

कंपनीचा खर्च आणि मनुष्यबळकर्मचारी संख्या: तीन महिन्यांपूर्वी कंपनीत ७,९१,००० कर्मचारी होते, जी आता ऑगस्टच्या अखेरीस ७,७९,००० वर आली आहे.पुनर्रचना खर्च : कंपनीने पुनर्रचना कार्यक्रमावर ८६५ दशलक्ष डॉलर्स खर्च करण्याचे निश्चित केले आहे. यापैकी मागील तिमाहीत कपातीसह इतर खर्चांवर ६१५ दशलक्ष डॉलर्स खर्च झाला, तर चालू तिमाहीत २५० दशलक्ष डॉलर खर्च होण्याची अपेक्षा आहे.

वाचा - दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

पुढील काळासाठी कंपनीची तयारी

  • एका बाजूला हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जात असले तरी, एक्स्चेंचर आपल्या कर्मचाऱ्यांच्या अपस्किलिंग वर मोठा भर देत आहे.
  • कंपनी जगभरातील आपल्या ७,००,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना 'एजेंटिक एआय'मध्ये प्रशिक्षण देत आहे.
  • कंपनीचा हा मोठा खर्च यावर विश्वास दर्शवतो की येणारा काळ हा अशा स्कॅलेबल इंटेलिजन्स सिस्टीमचा आहे, ज्या आपोआप निर्णय घेतील आणि त्यानुसार काम करतील. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे अनिवार्य आहे.
English
हिंदी सारांश
Web Title : Accenture Sacks Over 11,000 Employees Amid AI Transformation.

Web Summary : Accenture cut 11,000+ jobs globally due to AI's impact, urging reskilling. The firm invests heavily in AI training for remaining staff, signaling a shift towards automated systems. Restructuring costs hit $865 million.
टॅग्स :आर्टिफिशिअल इंटेलिजन्समाहिती तंत्रज्ञाननोकरी