Join us  

एसी, कूलर विक्रीचा ‘सूर्य’ यंदा तळपलाच नाही; उन्हाळ्यात पावसामुळे हंगाम बुडाला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2023 10:21 AM

अवकाळी पावसामुळे यावर्षी उन्हाचा तडाखा तुलनेने कमी हाेता.

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: अवकाळी पावसामुळे यावर्षी उन्हाचा तडाखा तुलनेने कमी हाेता. मात्र, एसी व कूलर विकणाऱ्या कंपन्यांच्या हंगामावर पाणी पडले.  तापमान फार न वाढल्यामुळे लाेकांनी या वस्तू विकत घेण्याची याेजना लांबणीवर टाकली. परिणामी या हंगामात ३५ ते ४०% विक्री घटली आहे.

गेल्या काही वर्षांपासून देशात कडक उन्हाळा अनुभवला जात आहे. अनेक ठिकणी पारा ४५ अंशाच्या वर गेला. त्यामुळे एसी, कूलर, फ्रीज या वस्तू विकणाऱ्या कंपन्यांचा व्यवसाय जाेरात झाला. मात्र, यंदा मार्च, एप्रिल, मे महिन्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पूर्वीप्रमाणे उन तापले नाही. कंपन्यांना यावर्षी १०% व्यवसाय वाढीची अपेक्षा हाेती. मात्र, त्यांची निराशा झाली. या वस्तूंच्या विक्रीवर लक्ष ठेवणाऱ्या बिझाेम या संस्थेच्या अहवालातून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

कूलिंग कंपन्यांची चिंता वाढली

अनेक कूलिंग उत्पादने बनविणाऱ्या कंपन्यांनी यावर्षी सुमारे ३० टक्के उत्पादन घटविण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळी उत्पादनांची विक्री घटली आहे. हा हंगाम महत्त्वाचा असताे. त्यामुळे माेठे नुकसान हाेण्याचीही शक्यता आहे.

या वस्तूंचीही भासली नाही गरज

केवळ एसी आणि कूलरच नव्हे तर आइसक्रीम, थंड तेल, टाल्कम पावडर, शीतपेये आणि साबणाच्या विक्रीतही घट झाली आहे. लाेकांना या वस्तू वापरण्याची गरजच पडली नाही. ५०-६०% व्यवसाय उन्हाळ्यात हाेताे.

अशी हाेते दरवर्षी विक्री

आइसक्रीम ५०-६०%कूलर    ८०%शीतपेये    ४५-५०% एसी    ५०-६०%फ्रीज    ४०-५०% पावडर/तेल/साबण    ५०-६०%

यावर्षी बसला फटका

एसी    ३५-४०%फ्रीज    ३५-४०%शीतपेये    ३५-३८%आइसक्रीम    ५०-६०%कूलर    ६-७%पावडर/तेल/साबण    ८-१०%

 

टॅग्स :व्यवसायउष्माघातपाऊस