Join us

चीनला झटका... 200 अमेरिकी कंपन्या भारतात येण्यास इच्छुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 16:38 IST

अमेरिकेच्या जवळपास 200 कंपन्या आपले उत्पादन केंद्र (मॅन्युफॅक्चरिंग सेंटर) लोकसभा निवडणुकीनंतर चीनमधून भारतात आणण्यास इच्छुक आहेत.

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या जवळपास 200 कंपन्या आपले उत्पादन केंद्र (मॅन्युफॅक्चरिंग सेंटर) लोकसभा निवडणुकीनंतर चीनमधूनभारतात आणण्यास इच्छुक आहेत. अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध मजबूत करण्यास प्रयत्नशील असलेली स्वयंसेवी संस्था यूएस-इंडिया स्ट्रेटजिक अँड पार्टनरशिप फोरमने (USISPF) याबाबतची माहिती दिली आहे. 

चीनच्या ऐवजी इतर पर्याय शोधणाऱ्या कंपन्यांकडे भारतात शानदार संधी उपलब्ध आहे, असे फोरमने म्हटले आहे. ग्रुपचे अध्यक्ष मुकेश अघी यांनी सांगितले की, अनेक कंपन्या चर्चा करत आहेत. भारतात गुंतवणूक करुन कशाप्रकारे चीनला पर्याय उपलब्ध होईल. तसेच, नवीन सरकारला सुधारणा वाढविण्यासाठी आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सूचना ग्रुपकडून देण्यात येणार आहेत.  

ई-कॉमर्स, डेटा यावर सक्तीचा प्रभाव नाहीएका मुलाखतीत सांगितले की, 'मला असे वाटले की हे संवेदनशील आहे. आम्ही प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि 12 ते 18 महिन्यात योग्य सूचना देणार आहेत. आम्ही पाहात आहोत की, ई-कॉमर्स, डेटाचे लोकल स्टोरेज यासारख्या निर्णयाला अमेरिकी कंपन्या स्थानिक फॅक्टर न मानता आंतराष्ट्रीय फॅक्टर मानत आहेत.' 

'नवीन सरकारने सुधारणांना गती द्यावी'गुंतवणूक वाढवण्यासाठी नवीन सरकारने काय केले पाहिजे असे मुकेश अघी यांना विचारले. यावेळी ते म्हणाले, 'नवीन सरकारने सुधारणांना गती देण्याची गरज आहे. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणली पाहिजे आणि अधिक पक्षांसोबत सल्ला मसलत करणे गरजेचे आहे.'

टॅग्स :चीनभारतव्यवसायअमेरिका