Join us

९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 13:45 IST

Warren Buffett News: जगातील आघाडीचे गुंतवणूकदार वॉरेन बफे दान देण्याच्या बाबतीत कधीही मागे हटत नाहीत. त्यांनी पुन्हा एकदा मोठं दान करण्याचा निर्णय घेतलाय.

Warren Buffett News: जगातील आघाडीचे गुंतवणूकदार वॉरेन बफे दान देण्याच्या बाबतीत कधीही मागे हटत नाहीत. त्यांनी गेट्स फाऊंडेशन आणि चार कौटुंबिक धर्मादाय संस्थांना बर्कशायर हॅथवेचे अतिरिक्त ६ अब्ज डॉलर्सचे शेअर्स दान केलेत. सुमारे दोन दशकांपूर्वी त्यांनी आपली संपत्ती दान केल्यापासूनची ही सर्वात मोठी वार्षिक देणगी आहे. बर्कशायर क्लास बी शेअर्सच्या अंदाजे १२.३६ दशलक्ष शेअर्सच्या देणगीमुळे बफे यांच्या धर्मादाय संस्थेच्या देणग्यांची संख्या ६० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाली.

कोणी किती शेअर्स दिले?

बफे यांनी गेट्स फाऊंडेशनला ९.४३ दशलक्ष शेअर्स, सुसान थॉम्पसन बफे फाऊंडेशनला ९,४३,३८४ शेअर्स आणि त्यांची मुले हॉवर्ड, सुसी आणि पीटर यांनी चालवलेल्या तीन धर्मादाय संस्थांना प्रत्येकी ६,६०,३६६ शेअर्स दान केले. या बफे फाऊंडेशन, शेरवूड फाऊंडेशन आणि नोवो फाऊंडेशन धर्मादाय संस्था आहेत. दरम्यान, वॉरेन बफे हे आताही बर्कशायरच्या १३.८% शेअर्सचे मालक आहेत.

३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स

२००६ पासून करताहेत दान

९४ वर्षीय बफे यांनी २००६ मध्ये त्यांची संपत्ती दान करण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षी त्यांनी त्यांचं मृत्युपत्र बदललं आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या उर्वरित संपत्तीपैकी ९९.५% त्यांच्या मुलांच्या देखरेखीखाली असलेल्या धर्मादाय ट्रस्टला दान केली. वॉरेन बफे १९६५ पासून ओमाहा, नेब्रास्का येथील बर्कशायरचे नेतृत्व करत आहेत. १.०५ ट्रिलियन डॉलर्सच्या बर्कशायर ग्रुपकडे सुमारे २०० व्यवसाय आणि डझनभर स्टॉक आहेत, ज्यात अॅपल आणि अमेरिकन एक्सप्रेसचाही समावेश आहे.

अलिकडेच असंही वृत्त आलं होतं की २०२६ च्या सुरुवातीला ग्रेग एबेल बर्कशायर हॅथवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) झाल्यानंतरही अब्जाधीश गुंतवणूकदार वॉरेन बफे संचालक मंडळाचे अध्यक्ष राहतील. सध्या बफे कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ आहेत तर एबेल त्याचे उपाध्यक्ष आहेत.

टॅग्स :गुंतवणूकपैसा