Join us

यंदा ९.४% पगारवाढ! देशात ३७% कंपन्या भरती करणार, ७५% कंपन्या कामगिरीनुसार देणार वेतनवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 08:34 IST

२०२० मध्येही कर्मचाऱ्यांना ८ टक्के वेतनवाढ देण्यात आली होती.

नवी दिल्ली : मागील पाच वर्षांत खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सातत्याने चांगली पगारवाढ दिली जात आहे. २०२५ मध्येही कर्मचाऱ्यांना सरासरी ९.४ टक्के इतकी वेतनवाढ दिली जाईल, असा अंदाज मनुष्यबळ सल्लागार संस्था ‘मर्सर’ने  सर्वेक्षणात मांडला  आहे. २०२० मध्येही कर्मचाऱ्यांना ८ टक्के वेतनवाढ देण्यात आली होती.

काही कंपन्या फ्रेशर्सना आकर्षित करण्यासाठी कंपन्या  विविध स्तरांवर काम करीत आहेत.   जागतिक स्थितीचा आढावा घेत रणनीतिक भरती, स्पर्धात्मक वेतन देण्याची तयारी, प्रशिक्षण  तसेच अपस्किलिंगसाठी प्रोत्साहन देण्याच्या विचारात आहेत. ७५ टक्के कंपन्यांनी प्रभावी कामाच्या आधारे वाढीव वेतन देण्याची तयारी चालवली आहे.

कर्मचारी कपात किती? २०२५ मध्ये ३७ टक्के कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याच्या विचारात आहेत. विविध क्षेत्रांमध्ये फ्रेशर्सना मागणी असल्याचे दिसत आहे. विविध कंपन्यांकडून केली जाणारी कर्मचारी कपात ११.९ टक्केवर स्थिर राहण्याची शक्यता आहे. 

सर्वाधिक वाढ कोणत्या क्षेत्रात?ऑटोमोबाईल क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे वेतन १० टक्केपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढीमुळे आणि सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमामुळे हे क्षेत्र तेजीत आहे. 

टॅग्स :कर्मचारीव्यवसाय