Join us
Daily Top 2Weekly Top 5

८ व्या वेतन आयोगाच्या नावाखाली कर्मचाऱ्यांची लूट; Whatsapp वरील 'त्या' लिंकवर क्लिक करताच पैसे गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 14:55 IST

Eighth Pay Commission : फसवणूक करणारे केंद्रीय कर्मचाऱ्यांना व्हॉट्सअॅप संदेश पाठवत आहेत, ज्यामध्ये तुम्ही तुमचा वाढीव पगार पाहू शकता असा दावा केला जात आहे.

Eighth Pay Commission Updates : आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असलेल्या एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आता सायबर चोरट्यांनी लक्ष केले आहे. नव्या वेतन रचनेनुसार पगार किती वाढणार, हे तपासण्यासाठी व्हॉट्सॲपवर एक 'सॅलरी कॅल्क्युलेटर'ची लिंक पाठवली जात आहे. मात्र, ही लिंक नसून तुमचे बँक खाते रिकामे करणारा सापळा असल्याचे समोर आले आहे.

फसवणुकीची 'मोडस ऑपरेंडी'सायबर ठग केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक व्हॉट्सॲप मेसेज पाठवतात. यामध्ये "तुमचा सुधारित पगार त्वरित तपासा" असा दावा केला जातो. मेसेजमधील लिंकवर क्लिक केल्यावर एक APK फाईल डाउनलोड करण्यास सांगितले जाते. ही फाईल म्हणजे प्रत्यक्षात एक 'मालवेअर' आहे. एकदा का ही फाईल तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल झाली की, तुमच्या मोबाईलचा संपूर्ण ताबा हॅकर्सकडे जातो. या माध्यमातून तुमचे बँकिंग ॲप्स, ओटीपी, पासवर्ड आणि खासगी माहिती चोरून बँक खात्यातून पैसे लंपास केले जातात.

सरकारचे आवाहन वाढता धोका लक्षात घेता सरकारने अधिकृत इशारा जारी केला आहे. "आठव्या वेतन आयोगाबाबतची कोणतीही अधिकृत माहिती केवळ सरकारी वेबसाइट किंवा अधिकृत प्रसारमाध्यमांतूनच दिली जाईल. व्हॉट्सॲपवर येणाऱ्या कोणत्याही अनधिकृत लिंकवर विश्वास ठेवू नका," असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

वाचा - महागडी सिगारेट गुंतवणूकदारांसाठी ठरली 'फायदेशीर'! करात वाढ होऊनही सिगारेट शेअर्समध्ये तेजीची लाट

स्वतःचा बचाव कसा कराल?

  • अनोळखी लिंक टाळा : व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडियावर आलेल्या कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.
  • APK फाईल डाऊनलोड करू नका : गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअर व्यतिरिक्त इतर कोठूनही ॲप्स डाऊनलोड करू नका.
  • गोपनीयता पाळा : तुमचा बँक तपशील, ओटीपी किंवा पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका.
  • येथे करा तक्रार : जर तुमची फसवणूक झाली असेल किंवा संशयास्पद मेसेज आला असेल, तर त्वरित १९३० या सायबर क्राईम हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा. 
टॅग्स :८वा वेतन आयोगपगारसायबर क्राइमधोकेबाजीव्हॉट्सअ‍ॅप