Join us  

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार Triple Bonanza, खात्यात जमा होणार मोठी रक्क; पंतप्रधान मोदी करणार घोषणा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 9:44 PM

येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 3 प्रकारचे खास गिफ्ट मिळणार आहेत...

येणारा महिना केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अनेक चांगल्या बातम्या घेऊन येत आहे. खरे तर येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 3 प्रकारचे खास गिफ्ट मिळणार आहेत. यांपैकी पहिले गिफ्ट म्हणजे, महागाई भत्ता (DA) आहे. कारण यात आता पुन्हा एकदा 4 टक्क्यांनी वाढ होणार आहे.

दुसरे गिफ्ट म्हणजे, DA एरियरवर सरकारसोबत सुरू असलेल्या चर्चेवरील निर्णय येऊ शकतो आणि तिसरे गिफ्ट म्हणजे, पीएफ खात्यात ऑगस्ट अखेरपर्यंत अथवा सप्टेंबरमध्ये व्याज जमा होऊ शकते. अर्थात कर्मचाऱ्यांच्या खात्यात या महिन्यात मोठी रक्कम जमा होणार आहे.

पुन्हा वाढणार महागाई भत्ता!डीए वाढ ही एआयसीपीआयच्या आकड्यांवर अवलंबून असते. यापूर्वी मे महिन्याच्या AICPI इंडेक्सच्या आंकड्यांवरूनही कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ निश्चित झाली होती. जून महिन्यातील AICPI इंडेक्सच्या आकड्यांमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. मे महिन्यात यात 1.3 पॉइंटची तेजी दिसून आली आणि तो वाढून 129 पॉइंटवर पोहोचला. जून महिन्याचा आकडा 129.2 वर पोहोचला आहे. आता सप्टेंबर महिन्यात महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ होईल.

याशिवाय, 18 महिन्यांपासून पेंडिंग असलेले एरियर (DR) प्रकरणही आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचले आहे. यावर लवकरच निर्णय येऊ शकतो. यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्याचे सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे.

PF चे व्याजही मिळणार - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) तब्बल 7 कोटी हून अधिक अकाउंट होल्डर्सच्या खात्यात व्याजाचे पैसे जमा होऊ शकतात. या महिन्याच्या अखेरपर्यंत पीएफ खातेधारकांच्या बँक खात्यात ब्याजाचे पैसे ट्रान्सफर होऊ शकतात. कारण आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी 8.1% या हिशेबाने पीएफचे व्याज खात्यात जमा होऊ शकते. 

 

टॅग्स :नरेंद्र मोदीकेंद्र सरकारकर्मचारी