Join us

रिलायन्स डिजिटलमध्ये ग्राहकांना ५% कॅशबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 04:42 IST

अक्षयतृतीयेच्या दिवशी मंगळवारी विविध वस्तूंच्या खरेदीवर बक्षीसरूपात ५ ग्रॅमपर्यंत सोने व पाच टक्के कॅशबॅक देण्याची योजना रिलायन्स डिजिटलने राबविली.

मुंबई : अक्षयतृतीयेच्या दिवशी मंगळवारी विविध वस्तूंच्या खरेदीवर बक्षीसरूपात ५ ग्रॅमपर्यंत सोने व पाच टक्के कॅशबॅक देण्याची योजना रिलायन्स डिजिटलने राबविली. वस्तूंच्या खरेदीसाठी इझी फायनान्सचे पर्यायही ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले होते. रिलायन्स डिजिटल, माय जिओ स्टोअर्स येथे व ६६६.१ी’्रंल्लूी्िरॅ्र३ं’.ूङ्मे या वेबसाईटवर असंख्य ग्राहकांनी अक्षय तृतीयेच्या योजनेचा लाभ घेतला.रिलायन्स डिजिटल ही देशातील पहिल्या क्रमांकाची इलेक्ट्रॉलिक्स रिटेलर आहे. रिलायन्स डिजिटल व माय जिओ स्टोअर्सची देशभरात दोन हजार दुकाने आहेत. रिलायन्स डिजिटलमध्ये ५०० देशी व विदेशी ब्रँडच्या वस्तू विकायला आहेत. त्यामध्ये टीव्ही, डिजिटल कॅमेरा, कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर्स, वॉटर प्युरिफायर, किचन व होम अप्लायन्सेस अशा अनेक प्रकारच्या वस्तू आहेत.होम थिएटर्स, टेलिव्हिजन यांच्या विक्रीसाठी रिलायन्स डिजिटलच्या शोरूममध्ये खास व्यवस्था करण्यात आली आहे. त्याला एक्सपिरिअन्स झोन असे नाव देण्यात आले आहे. आफ्टर सेल्स सर्व्हिसही रिलायन्स डिजिटलकडून ग्राहकांना तत्परतेने पुरविली जाते. रिलायन्स रेस्क्यू या नावाने ओळखली जाणारी सेवा आठवड्याचे सातही दिवस सुरू असते.

टॅग्स :रिलायन्सअक्षय तृतीया