Join us

गुंतवणूकदार श्रीमंत! ४.५० लाख कोटींचा फायदा; तीन दिवसांपासून शेअर बाजारात तेजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 07:53 IST

गेल्या तीन दिवसात बाजारात असलेल्या तेजीमुळे गुंतवणूकदारांचे ४.४६ लाख कोटीं रूपयांचे भांडवल वाढले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : युरोपमधील शेअर बाजारामध्ये असलेली तेजी, परकीय वित्त संस्थांसह गुंतवणूकदारांकडून करण्यात आलेली मोठी खरेदी यामुळे मुंबई शेअर बाजारात तेजी होती. सेन्सेक्सने प्रथमच ५९ हजारांची पातळी ओलांडली  आहे. गेल्या तीन दिवसात बाजारात असलेल्या तेजीमुळे गुंतवणूकदारांचे ४.४६ लाख कोटीं रूपयांचे भांडवल वाढले आहे. 

मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ४१७.९६ अंशांनी वाढून ५९,१४१.१६ अंशांवर बंद झाला. तत्पूर्वी या निर्देशांकाने ५९,२०४.२९ अंशांचा नवीन उच्चांक नोंदवला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)  ११०.०५ अंशांनी वाढून १७,६२९.५० अंशांवर बंद झाला. तत्पूर्वी त्यामध्येही वाढ होऊन त्याने १७,६४४.६० अंश अशी नवीन उंची गाठली आहे.

गुरूवारच्या व्यवहारांमध्ये  बँकांच्या समभागांमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी असलेली दिसून आली. मात्र, आयटी कंपन्या व पोलाद कंपन्यांना विक्रीचा फटका बसून त्यांचे दर खाली आले. परकीय वित्त संस्थांनी बुधवारी २३२.८४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. 

टॅग्स :शेअर बाजारव्यवसाय