Join us

F&O मध्ये ४५ नवे स्टॉक्स : Paytm, जिओ, फायनान्शिअल, LIC; Yes Bank सारख्या शेअर्सची एन्ट्री, काय फरक पडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 14:04 IST

F&O Stocks list : वेळोवेळी बाजारातील काही शेअर्स एफ अँड ओ स्टॉक लिस्टमध्ये जोडले जातात आणि काही या यादीतून वगळले जातात.

F&O Stocks list : वेळोवेळी बाजारातील काही शेअर्स एफ अँड ओ स्टॉक लिस्टमध्ये जोडले जातात आणि काही या यादीतून वगळले जातात. आजपासून एफ अँड ओ लिस्टमध्ये ४५ नव्या स्टॉक्सची भर पडली आहे. एफ अँड ओ हे स्टॉक एक्स्चेंजच्या फ्युचर्स आणि ऑप्शन सेगमेंटमध्ये ट्रेड केले जाणारे सिक्युरिटीज आहेत.

एफ अँड ओ म्हणजे काय?

फ्युचर्स - फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट असलेला सेगमेंट आणि ऑप्शन सेगमेंट मिळून एफ अँड ओ बनवतात. फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट म्हणजे भविष्यात विशिष्ट तारखेला कोणत्याही अंडरलाईंग असेट (उदा. स्टॉक, कमोडिटी किंवा करन्सी) खरेदी किंवा विक्री करण्याचा करार.ऑप्शन्स - भारतात नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) निवडक शेअर्सवर एफ अँड ओ ट्रेडिंगची सुविधा देतात. हे शेअर्स एफ अँड ओ स्टॉक्स म्हणून ओळखले जातात.

एफ अँड ओ स्टॉकची वैशिष्ट्ये

एफ अँड ओ स्टॉक्स सामान्यत: अत्यंत लिक्विडेटेड असतात, ज्यामुळे ते खरेदी आणि विक्री करणे सोपं होतं. एफ अँड ओ शेअर्स बऱ्याचदा उच्च अस्थिरता दर्शवितात, ज्यामुळे किंमतीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार होऊ शकतात. शिवाय, एफ अँड ओ शेअर्समधील ट्रेडिंग वॉल्यूम जास्त आहे, ज्यामुळे बिड आस्क स्प्रेड कमी होऊ शकतो.

मार्केट इफेक्ट्स : एफ अँड ओ शेअर्स मार्केट सेंटिमेंट आणि बातम्यांच्या घटनांबाबत अधिक संवेदनशील असू शकतात.

कोणत्या स्टॉक्सची एन्ट्री

अदानी एनर्जी सोल्यूशन्स लिमिटेड, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, एंजल वन लिमिटेड, एपीएल अपोलो ट्यूब्स लिमिटेड, अदानी टोटल गॅस लिमिटेड, बँक ऑफ इंडिया, बीएसई लिमिटेड, कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, सीईएससी लिमिटेड, सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्यूशन्स लिमिटेड, सायंट लिमिटेड, दिल्लीवेरी लिमिटेड, एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड, एचएफसीएल लिमिटेड, हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, इंडियन बँक, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, जिंदाल स्टेनलेस लिमिटेड, जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड, कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेड, केईआय इंडस्ट्रीज लिमिटेड, केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिटेड, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड, मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूट लिमिटेड, एनसीसी लिमिटेड, एनएचपीसी लिमिटेड, एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेड, ऑइल इंडिया लिमिटेड, वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड, पीबी फिनटेक लिमिटेड, पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड, प्रेस्टीज इस्टेट्स प्रोजेक्ट्स लिमिटेड, एसजेव्हीएन लिमिटेड, सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग्स लिमिटेड, सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेड, टाटा एल्क्सी लिमिटेड, ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया लिमिटेड, युनियन बँक ऑफ इंडिया, वरुण बेवरेजेस लिमिटेड, येस बँक लिमिटेड (येस बँक) आणि झोमॅटो लिमिटेड.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक