Join us

40 GST: 'या' लोकांच्या खिशावर पडणार ताण, कोणत्या वस्तुंवर ४० टक्के जीएसटी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 09:12 IST

40 GST Items List: जीएसटी परिषदेच्या बैठकीत सर्वांना प्रतिक्षा असलेला निर्णय घेतला गेला. केंद्र सरकारने जीएसटीचे चार स्लॅब काढून टाकले आणि दोन स्लॅब जाहीर केले. यात ४० टक्के जीएसटीही ठेवला गेला असून, तो विशेष स्लॅब असणार आहे. 

40 GST Products: वाढत्या महागाईमुळे जेरीस आलेल्या जनतेला केंद्र सरकारने अखेर दिलासा दिला. केंद्र सरकारने घरात लागणाऱ्या अनेक वस्तुंवरील जीएसटीमध्ये कपात केली आहे. जीएसटी परिषदेने १२ टक्के आणि २८ टक्के हे दोन्ही स्लॅब वगळले. त्यामुळे आता दोनच स्लॅब देशात असणार असून, ४० टक्के हा विशेष स्लॅब असणार आहे. या स्लॅबमध्ये येणाऱ्या वस्तू खरेदी करणाऱ्यांच्या खिशावर ताण पडणार आहे. 

४० टक्के जीएसटी स्लॅबमध्ये अशा गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे, ज्या शौक किंवा चैनीसाठी केल्या जातात. जीएसटी परिषदेच्या ५६व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

२२ सप्टेंबरपाासून लागू होणार नवीन जीएसटी स्लॅब

बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नव्या जीएसटी स्लॅबची घोषणा केली. चैनीच्या आणि आरोग्यास हानिकारक वस्तूंसाठी वेगळा स्लॅब तयार करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. 

यात पान मसाला, सिगारेट, जर्दा, तंबाखू, सुपर लग्झरी वस्तू, एडेड शुगर, कार्बोनेटिड ड्रिंक्स, लग्झरी कार, फास्ट फूड या या श्रेणीतील वस्तूंवर ४० टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. या वस्तुंवर पूर्वी २८ टक्के जीएसटी होता. 

कोणत्या वस्तू खरेदी करताना ४० टक्के जीएसटी?

फळांचा रस, कार्बोनेटेड पेय, फळांच्या रसापासून तयार केल्या जाणाऱ्या ड्रिंक्स. 

कॅफीनयुक्त पेय पदार्थ, अनिर्मित तंबाखू (पाने वगळून).

सिगार, सिगारिलो आणि सिगारेट. तंबाखू किंवा तंबाखूला पर्याय म्हणून असलेली. 

रेसिंग कार, इतर कार, त्याचबरोबर खास व्यक्तींना चालवण्यासाठी तयार केलेल्या कार. 

३५० सीसी इंजिन क्षमता असलेल्या मोटारसायकली. 

अशी गाडी ज्यामध्ये स्पार्क इमिग्रेशन असेल, रेसिप्रोकेटिंग पिस्टन इंजिन. ज्याची क्षमता १२०० सीसीपेक्षा अधिक असेल किंवा ज्यांची लांबी ४००० मिमीपेक्षा अधिक असेल.   प्रायव्हेट जेट, खासगी वापरासाठी असलेले विमान. 

याट, नौका आणि इतर मनोरंजन किंवा खेळण्यासाठीची जहाजे. 

रिव्हॉल्व्हर, पिस्तुल आणि इतर पिस्तुल. 

पाईप, बाऊल, सिगार वा सिगारेट, होल्डर आणि त्याचे पार्टस्. 

टॅग्स :जीएसटीनिर्मला सीतारामनकरकेंद्र सरकार