Join us

रोज ३जीबी डेटा, १०० SMS आणि अनलिमटेड कॉलिंग, BSNLचा जबरदस्त प्लॅन, केवळ एवढी आहे किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 15:17 IST

BSNL: गेल्या काही दिवसांमध्ये खासगी टेलिकॉमक कंपन्यांकडून सातत्याने आपल्या टॅरिफ प्लॅन्सच्या किमतींमध्ये वाढ केली जात आहे. अशा परिस्थितीत बीएसएनएल अशी एकमेव टेलिकॉम कंपनी आही जी अगदी कमी किमतीमध्ये चांगले प्लॅन्स ग्राहकांना ऑफर करत आहे. 

मुंबई -  गेल्या काही दिवसांमध्ये खासगी टेलिकॉमक कंपन्यांकडून सातत्याने आपल्या टॅरिफ प्लॅन्सच्या किमतींमध्ये वाढ केली जात आहे. आता जियोनेही याचे संकेत देताना आपल्या एका प्लॅनची किंमत १५० रुपयांनी वाढवली आहे. अशा परिस्थितीत बीएसएनएल अशी एकमेव टेलिकॉम कंपनी आही जी अगदी कमी किमतीमध्ये चांगले प्लॅन्स ग्राहकांना ऑफर करत आहे. 

कंपनीच्या पोर्टफोलियोमध्ये अनेक किफायतशीर प्लॅन्स उपलब्ध आहेत. आज आम्ही अशा एका प्लॅन्सची सविस्तर माहिती घेणार आहोत. या प्लॅनमध्ये केवळ डेटाच नाही तर कॉलिंग आणि एसएमएसबाबतही लाभ मिळत आहेत.

बीएसएनएल २९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन ऑफर करण्यात आला आहे. हा प्लॅन ३० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये युझर्सना डेली ३जीबी डेटा मिळतो. म्हणजेच पूर्ण प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण ९० जीही डेटा मिळतो. जर तुम्ही कमी किमतीमध्ये अधिक डेटा मिळून इच्छित असाल तर तुमच्यासाठी हा प्लॅन एक चांगला पर्याय आहे.

एफयूपी लिमिट पूर्ण झाल्यानंतर युझर्सना ८० केबीपीएसच्या स्पीडने डेटा मिळत राहील. या प्लॅनमध्ये युझर्सना केवळ डेटाचाच लाभ मिळत नाही तर तुम्ही कॉलिंग आणि एसएमएसचा लाभही घेऊ शकता.

ग्राहकांना २९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस दररोज मिळतात. खासगी कंपन्यांच्या तुलनेत हा प्लॅन किफायतशीर प्लॅन आहे. मात्य या प्लॅनच्या काही मर्यादाही आहेत. कंपनी या प्लॅनमध्ये तुम्हाला केवळ ३जीबी डेटा देत आहे. मात्र तो ३जी डेटा आहे. त्यात तुम्हाला ४जीचा स्पिड मिळणार नाही.   

टॅग्स :बीएसएनएलमोबाइलइंटरनेट