Join us  

अलर्ट! 30 जूनपर्यंत लवकर आटपून घ्या 'ही' महत्त्वाची काम; नाहीतर होईल मोठं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 2:16 PM

30 june 2021 deadline : जर तुम्ही या महिनाअखेरपर्यंत ही ठराविक काम न केल्यास तुम्हाला नुकसान होऊ शकते. येत्या जून अखेरपर्यंत कोणती काम करायची आहेत हे जाणून घ्या...

नवी दिल्ली - जून महिन्याची 30 तारीख ही अनेक महत्त्वाची कामं पूर्ण करण्याची शेवटची तारीख आहे. या महिना अखेरपर्यंत तुम्हाला पॅन-आधार लिंक करणे, आयएफएससी कोड बदलणे आणि चेकबुक बदलणे यासारख्या अनेक गोष्टी करणे अनिवार्य असणार आहे. यासोबतच अनेक बँकांनी फिक्स्ड डिपॉझिटवर जास्त व्याजदर देण्याची घोषणा केली आहे. ही ऑफर केवळ 30 जूनपर्यंत वैध असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही या महिनाअखेरपर्यंत ही ठराविक काम न केल्यास तुम्हाला नुकसान होऊ शकते. येत्या जून अखेरपर्यंत कोणती कामं करायची आहेत हे जाणून घ्या...

IFSC कोड अपडेट करणं बंधनकारक

येत्या 1 जुलै 2021 पासून सिंडिकेट बँकेचा आयएफएससी कोड (IFSC Code) बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांनी येत्या 30 जूनपर्यंत बँकेच्या शाखेत जाऊन IFSC कोड अपडेट करावा, असे आदेश कॅनरा बँकेने दिले आहेत. काही महिन्यांपूर्वी कॅनरा बँकेचं सिंडिकेट बँकेत विलीनीकरण करण्यात आले. यानंतर सिंडिकेट बँकेने केलेल्या ट्वीटनुसार, SYNB पासून सुरु होणारे eSyndicate IFSC कोड बदलण्यात आले आहेत. त्यामुळे सिंडिकेट बँकेतील ग्राहकांना नवीन IFSC कोड अपडेट करावा लागणार आहे.

आधार आणि पॅन कार्ड लिंक करणे बंधनकारक

आयकर विभागाने आधार आणि पॅन कार्ड (PAN) जोडणे बंधनकारक केले आहे. कोरोनामुळे आधार आणि पॅनकार्ड लिंक करण्याची तारीख सातत्याने वाढवण्यात आली होती. त्यानुसार येत्या 30 जून 2021पर्यंत आधार आणि पॅन कार्ड जोडणे बंधनकारक असणार आहे. जर तुम्ही आधारकार्ड पॅनशी जोडलं नसेल तर त्याला 1000 रुपये दंड होऊ शकतो. तसेच तुमचे पॅनकार्ड बंद होऊ शकते. SBI, HDFC बँक, ICICI बँक आणि बँक ऑफ बड़ोदा या बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी (FD) योजना सुरू केली. या विशेष योजनेची मुदत 30 जून 2021 रोजी संपत आहे. या योजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सर्वसामान्यांपेक्षा जास्त व्याज मिळते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

SBI, HDFC, ICICI ग्राहकांसाठी मोठी बातमी; 30 जूनला बंद होणार 'ही' सुविधा

 मे 2020 मध्ये या बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक खास योजना आणली होती. ठराविक कालावधीसाठी असलेल्या मुदत ठेव योजनेत ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू असलेल्या व्याजदरापेक्षा अर्ध्या टक्क्याहून अधिक व्याज दर देण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसाधारण ग्राहकाला मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा एक टक्का अधिक व्याज ज्येष्ठ नागरिकांना मिळते.या योजनेची अंतिम मुदत 31 मार्च होती. मात्र ती नंतर 30 जून 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. आता ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर फक्त हा महिना बाकी आहे. सध्या स्टेट बँक (SBI) पाच वर्षांच्या मुदतीसाठी सामान्य नागरिकांना 5.4 टक्के व्याज देते. मात्र एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने विशेष मुदतठेव योजनेअंतर्गत गुंतवणूक केली तर त्याला 6.20 टक्के दराने व्याज मिळते. ही योजना 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी आहे

टॅग्स :बँकभारतपैसा