Join us
Daily Top 2Weekly Top 5

एका शेअरवर 3 शेअर फ्री! कंपनीची मोठी घोषणा; शेअर बनला रॉकेट, दिला १८२% परतावा, गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 17:47 IST

या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १०३० रुपये, तर नीचांक २६९.९५ रुपये आहे...

शेअर बाजारातील स्मॉलकॅप कंपनी इन्फोबीन्स टेक्नॉलॉजीज (InfoBeans Technologies) च्या शेअर्समध्ये बुधवारी तुफान तेजी दिसून आली. हा शेअर बीएसईवर (BSE) २० टक्क्यांनी वधारून ८८८.९० रुपयांवर पोहोचला. महत्वाचे म्हणजे, गेल्या वर्षभरात या आयटी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना १८२ टक्क्यांहून अधिक नफा मिळवून दिला आहे. या तेजीचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीची दमदार तिमाही कामगिरी आणि बोनस शेअर्सची घोषणा.

कंपनीने आपल्या शेअरधारकांना ३:१ या प्रमाणात बोनस शेअर्स वाटण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच, गुंतवणूकदारांकडील प्रत्येक १ शेअरवर कंपनी ३ बोनस शेअर्स मोफत वाटणार आहे. खरे तर कंपनी आपल्या शेअर धारकांना पहिल्यांदाच बोनस शेअर वाटत आहे. यासाठी २७ फेब्रुवारी २०२६ ही 'रेकॉर्ड डेट' निश्चित करण्यात आली आहे. याच बरोबर, सॉफ्टवेअर डिलिव्हरीचा वेग वाढवण्यासाठी कंपनीने आपले नवीन एआय-पावर्ड 'SDD एक्सेलरेटर' सोल्यूशनही लाँच केले आहे.

कंपनीचा नफा १७३ टक्क्यांची वाढला - चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा वार्षिक आधारावर १७३.२३ टक्क्यांनी वाढून १९.२९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी ७.०६ कोटी रुपये होता. कंपनीची निव्वळ विक्री ३९.८ टक्क्यांनी वाढून १३४.४६ कोटी रुपये झाली असून, इबिट्डा (EBITDA) देखील ८८.८४ टक्क्यांनी वधारला आहे.

गुंतवणूकदारांची लॉटरी - या शेअरची किंमत २८ जानेवारी २०२५ रोजी ३१४.४० रुपये होती, जी २८ जानेवारी २०२६ रोजी ८८८.९० रुपयांवर पोहोचली. गेल्या सहा महिन्यांत शेअरने ५६ टक्क्यांहून अधिक झेप घेतली आहे. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १०३० रुपये, तर नीचांक २६९.९५ रुपये आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : InfoBeans Tech Shares Soar: 3 Free Shares Per Share!

Web Summary : InfoBeans Technologies shares surged after announcing 3:1 bonus shares and strong Q3 results. Investors rejoice as the stock delivered 182% returns in a year. Profit jumped 173%.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकस्टॉक मार्केट