Join us

हवाई सेवेबाबत सप्टेंबर महिन्यात ७०१ तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 07:01 IST

डीजीसीएची माहिती । प्रवाशांच्या सुविधांवर २ कोटींचा खर्च

खलील गिरकर 

मुंबई : देशांतर्गत हवाई प्रवासाबाबत सप्टेंबर महिन्यात ७०१ प्रवाशांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यापैकी ६३३ तक्रारींचे निराकरण करण्यात आले. तर, ६८ तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत. प्रलंबित सर्व तक्रारी एअर इंडियाच्या सेवेबाबत आहेत. उड्डाणाला विलंब होणे, विमानात प्रवेश नाकारणे, उड्डाण रद्द होणे व इतर सुविधांबाबत या तक्रारी करण्यात आल्या होत्या. सर्वांत जास्त २६४ तक्रारी इंडिगोच्या सेवेबाबत करण्यात आल्या होत्या. त्याखालोखाल एअर इंडियाच्या सेवेबाबत २३९ तक्रारी आल्या. एअर एशियाबाबत २५, गो एअर ६०, स्पाईसजेट १०१, ट्रुजेटबाबत २, विस्तारा ९ व एअर डेक्कनबाबत १ तक्रार नोंदविण्यात आली होती.

उड्डाण रद्द झाल्याचा फटका २३,३४१ प्रवाशांना बसला. त्यांचा परतावा, हॉटेल सुविधा आदींसाठी ६२,५२,००० हजार खर्च करण्यात आले. उड्डाणाला विलंब झाल्याचा फटका १,५४,४७९ प्रवाशांना बसला. त्यांना परतावा, जेवण आदींसाठी १,३४,८२,०० हजार रुपये खर्च केले. तर, उड्डाणाला विलंब झाल्याचा फटका १०१० प्रवाशांना बसला. त्यांना परतावा, दुसऱ्या विमानाचे तिकीट आदींसाठी ३९,२९,००० रुपये खर्च झाले. विमानाच्या उड्डाणाला विलंब, उड्डाण रद्द होणे व विमानात प्रवेश नाकारणे याचा फटका एकत्रितपणे १,७८,८३० जणांना बसला व त्यापोटी २,३६,६३,००० हजार रुपये खर्च झाले. नागरी हवाई वाहतूक महासंचालनाल (डीजीसीए) यांनी अहवालाद्वारे ही माहिती दिली.सर्वाधिक फटका इंडिगोच्या प्रवाशांनाउड्डाणे रद्द झाल्याचा सर्वांत जास्त फटका इंडिगोच्या ११,३६६ प्रवाशांना बसला. स्पाईसजेटच्या ४, ७२३ प्रवाशांनाही फटका बसला. उड्डाणाला २ तासांपेक्षा जास्त काळ विलंब झाल्याचा फटका सर्वांत जास्त एअर इंडियाच्या ५८,१४७ प्रवाशांना बसला तर स्पाईसजेटच्या ४७,८२५ प्रवाशांना बसला. प्रवाशांना विमानात प्रवेश नाकारल्याची सर्वांत जास्त प्रकरणे एअर इंडियाच्या ५८२ प्रवाशांसोबत घडली. त्याखालोखाल स्पाईसजेटच्या ३४७ प्रवाशांसोबत घडली.

टॅग्स :इंडिगोएअर इंडिया