Join us

३ दिवसांत २० हजार काेटी गमावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 05:56 IST

आपटले पेटीएमचे शेअर्स, कर्मचारीही दुसऱ्या नाेकरीच्या शाेधात

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आरबीआयने कारवाई केल्यानंतर ‘पेटीएम’चा शेअर तीन सत्रांमध्ये ४२ टक्क्यांनी काेसळला आहे. शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आला असून, गुंतवणूकदारांनी तीन दिवसांत जवळपास २० हजार ५०० काेटी रुपये गमाविले आहेत. दुसरीकडे पेटीएमचे ग्राहक आणि व्यापारी इतर पर्यायांकडे वळू लागले असून, आता कंपनीतील कर्मचारीही नवी नाेकरी शाेधू लागले आहेत.

१ फेब्रुवारीपासून पेटीएमचा शेअर ७६१ रुपयांवरून ३२३ रुपयांनी घसरला आहे. सलग तिसऱ्या दिवशी शेअरमध्ये लाेअर सर्किट लागले.  आरबीआयने निर्बंध घातल्यामुळे गुंतवणूकदारांनी कंपनीचे शेअर्स विकण्याचा सपाटा लावला आहे. 

कर्मचारी नव्या नाेकऱ्यांच्या शाेधातnआरबीआयने दणका दिल्यानंतर आता कंपनीतील कर्मचारी नवी नाेकरी शाेधू लागले आहेत. तंत्रज्ञांसह मर्चंट बँकिंग तसेच विपणन विभागातील कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. nयासंदर्भात एक अहवाल सादर झाला आहे. कंपनीने सध्या काेणालाही कामावरून काढणार नसल्याचे म्हटले, तरी कर्मचारी सुरक्षित पर्याय शाेधू लागले आहेत.

ईडी चाैकशीचा कंपनीकडून इन्कार कंपनीचे संस्थापक, सीईओ आणि कंपनीवर ईडीने कारवाई केलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. काही युझर्स आणि मर्चंट्स तपासाच्या कक्षेत असून त्यांची चाैकशी करण्यात येत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

३१  काेटी ई-वाॅलेट्स निष्क्रिय करण्यात आले आहेत.

३ काेटी पेमेंट बँक खाती निष्क्रिय केली आहेत.

७२ टक्क्यांनी शेअर आतापर्यंत काेसळला आहे.

३५ हजार कर्मचारी कंपनीत आहेत.

१ हजार जणांना डिसेंबरमध्ये कामावरून काढले हाेते.

टॅग्स :पे-टीएमशेअर बाजार