Join us

वर्षाअखेरपर्यंत २० कोटी ईव्ही रस्त्यांवर; किमती घटल्याने आकर्षण वाढले, जगभरात बाजार विस्तार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 04:26 IST

भारतासह आशिया आणि लॅटिन अमेरिका यांच्या देशांमध्ये ईव्हींची मागणी वाढली आहे.

लोकमत न्य़ूज नेटवर्क, नवी दिल्ली: जगभरात इलेक्ट्रिक वाहने अर्थात ईव्हींचा बाजार वेगाने विस्तारताना दिसत आहे. २०३० मध्ये जगभरात विकल्या जाणाऱ्या ४० टक्क्यांहून अधिक गाड्या ईव्ही असतील. 

२०२५ च्या अखेरीपर्यंत जगभरातील ईलेक्ट्रिक वाहनांची संख्या तब्बल २० कोटींहून अधिक असेल. म्हणजेच विकली जाणारी प्रत्येक चौथी कार ही ईव्ही असेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने (आयईए) आपल्या ताज्या अहवालात वर्तविला आहे. 

भारतासह आशिया आणि लॅटिन अमेरिका यांच्या देशांमध्ये ईव्हींची मागणी वाढली आहे. २०२४ मध्ये या भागांमध्ये ईव्हींच्या विक्रीत ६० टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती. तर भारतात २०१९ मध्ये फक्त ६८० ईव्हीं विकल्या गेल्याची नोंद झालेली आहे. परंतु, २०२४ पर्यंत हा आकडा वाढून एक लाखांच्या पुढे गेला आहे.  

किमती घटल्याने आकर्षण वाढले : अहवालात सांगितले गेले आहे की, २०२४ मध्ये ईव्हीच्या बॅटरीच्या किंमतीत घसरण झाली. वाढत्या स्पर्धेमुळे इलेक्ट्रिक कार्सच्या सरासरी किंमतीही घट झाली. चीनमध्ये गेल्या वर्षी विकल्या गेलेल्या दोन-तृतीयांश ईव्ही पारंपरिक पेट्रोल-डिझेल कार्सपेक्षा स्वस्त होत्या, तर तिथे ईव्हीला कोणतीही सरकारी अनुदानही दिले गेले नाही.

 

 

टॅग्स :इलेक्ट्रिक कार / स्कूटर