Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्राप्तिकर छाप्यांमध्ये १७ कोटी जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 05:11 IST

आयकर विभागाने तमिळनाडूतील ख्रिस्ती फ्रीजगॅ्रम इंडस्ट्री आणि अग्नी गु्रप आॅफ कंपनीजच्या परिसरात घातलेल्या छाप्यांत काही विदेशी चलनासह १७ कोटी रुपये रोख, दहा किलो सोने आणि मालमत्तेचा दस्तावेज जप्त केला.

नवी दिल्ली - आयकर विभागाने तमिळनाडूतील ख्रिस्ती फ्रीजगॅ्रम इंडस्ट्री आणि अग्नी गु्रप आॅफ कंपनीजच्या परिसरात घातलेल्या छाप्यांत काही विदेशी चलनासह १७ कोटी रुपये रोख, दहा किलो सोने आणि मालमत्तेचा दस्तावेज जप्त केला.ही माहिती तपास शाखेच्या सूत्रांनी रविवारी दिली. हे छापे शुक्रवारी पहाटे ७० ठिकाणी टाकण्यात आले होते व ते रविवारी तात्पुरते थांबविले गेले. वरील दोन कंपन्यांनी कर चुकविल्याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केली गेली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे उद्योजक जप्त केलेल्या रोख पैशांचा हिशेब देऊ शकले नाहीत व विदेशी चलन कुठून आले, याचाही खुलासा करू शकलेले नाहीत. विदेशी चलन व्यवस्थापन कायदा, १९९९ नुसार ठरावीक मर्यादेबाहेर विदेशी चलन बाळगणे हा गुन्हा आहे.

टॅग्स :पैसाइन्कम टॅक्स