Join us

भारतात १३,२६३ अब्जाधीश; वर्षभरात ६ टक्क्यांनी वाढ, पाच वर्षांत संख्या पोहोचेल २० हजारांच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 06:11 IST

रिअल इस्टेट सल्लागार कंपनी नाइट फ्रँक इंडियाने ‘द वेल्थ रिपोर्ट-२०२४’ बुधवारी सादर केला.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : भारतातील अत्यंत श्रीमंतांची संख्या २०२३ मध्ये वार्षिक आधारावर ६ टक्क्यांनी वाढून १३,२६३ वर पोहोचल्याचे ‘नाइट फ्रँक इंडिया’च्या अहवालातून समोर आले आहे. पुढील पाच वर्षांत अर्थात २०२८ पर्यंत देशातील ‘अल्ट्रा-हाय-नेटवर्थ’ अर्थात अत्यंत श्रीमंतांची संख्या २० हजारांच्या घरात पोहोचेल, असेही या अहवालात म्हटले आहे. 

रिअल इस्टेट सल्लागार कंपनी नाइट फ्रँक इंडियाने ‘द वेल्थ रिपोर्ट-२०२४’ बुधवारी सादर केला. २०२२ मध्ये देशातील श्रीमंतांची संख्या १२,४९५ इतकी होती. २०२३ मध्ये यात ६.१ टक्क्यांची वाढ होऊन ही संख्या १३,२६३ वर पोहोचली. भारतातील श्रीमंतांची संख्या २०२८ पर्यंत १९,९०८ पर्यंत वाढेल असे यात म्हटले आहे. ‘नाइट फ्रँक इंडिया’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल म्हणाले की, देशातील आर्थिक समृद्धी व वाढत्या संधी याचा हा मोठा पुरावा आहे. पाच वर्षांत ही संख्या ५०.१ टक्क्यांनी वाढू शकते. 

अत्यंत श्रीमंत म्हणजे कोण?जवळची निव्वळ संपत्ती ३० दशलक्ष डॉलर्स (२.४८ अब्ज रुपये) किंवा त्याहून अधिक असेल, त्या व्यक्तीला ‘अल्ट्रा हाय नेटवर्थ इंडिविज्युअल’ अर्थात अत्यंत श्रीमंत व्यक्ती असे संबोधले जाते.

संपत्ती वाढणार ९० टक्क्यांनीnनाइट फ्रँकच्या अहवालानुसार, २०२४ मध्ये भारतातील अत्यंत श्रीमंतांची निव्वळ संपत्ती ९० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.nअत्यंत श्रीमंतांपैकी ६३ टक्के जणांची निव्वळ संपत्ती १० टक्क्यांनी वाढू शकते.nतुर्कीमध्ये श्रीमंत लोकांची संख्या वार्षिक आधारावर सर्वात जास्त ९.७ टक्क्यांनी वाढल्याचे दिसते.  

टॅग्स :पैसा