व्हेनेझुएलामध्ये सत्तांतर घडून आणल्यानंतर अमेरिका आणि व्हेनेझुएलामधील आर्थिक संबंध झपाट्याने बदलत आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना सत्तेवरून हटवल्यानंतर आता दोन्ही देशांमध्ये तब्बल १००० किलो सोन्याच्या निर्यातीचा मोठा करार झाल्याची माहिती समोर आली आहे. या करारानुसार व्हेनेझुएलामधील सोने अमेरिकन बाजारात पाठवले जाणार असून, यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारिक संबंधांना नवे वळण मिळणार आहे.
१००० किलो सोन्याचा मोठा व्यवहार
मीडिया रिपोर्टनुसार, व्हेनेझुएलाची सरकारी कंपनी मायनरव्हेन आणि जागतिक कमोडिटी ट्रेडिंग कंपनी ट्राफिगुरा यांच्यात महत्त्वाचा करार झाला आहे. या करारानुसार सुमारे १००० किलोग्राम सोन्याच्या विटा (Gold Bars) अमेरिकन बाजारात पाठवले जातील. या सोन्याची शुद्धता सुमारे 98% असेल. अमेरिकेत पोहोचवण्याची जबाबदारी ट्राफिगुरा कंपनी पार पाडणार आहे.
अमेरिका-व्हेनेझुएला संबंधांना नवे वळण
मादुरो यांच्या सत्तेचा अंत झाल्यानंतर अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील व्यापारिक संबंध वेगाने सुधारताना दिसत आहेत. ४4 मार्च २०२६ रोजी व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिगस आणि अमेरिकेचे अंतर्गत व्यवहार सचिव डग बर्गम यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत प्रामुख्याने खाण क्षेत्रातील सुधारणा, खनिज उत्खनन, ऊर्जा आणि संसाधनांवरील सहकार्य या मुद्द्यांवर चर्चा झाली.
तेल संसाधनांवर अमेरिकेचे लक्ष
रिपोर्टनुसार, व्हेनेझुएलाच्या प्रचंड तेल साठ्यांवर नियंत्रण मिळवल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने खनिज उत्खननाशी संबंधित केलेला हा तिसरा मोठा करार आहे. याशिवाय, ट्राफिगुरा कंपनी अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील १ अब्ज डॉलरच्या तेल व्यवहारांमध्येही सक्रिय असल्याचे सांगितले जाते. या नव्या भागीदारीबाबत ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Truth Social वरून सकारात्मक प्रतिक्रिया देत व्हेनेझुएलाच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे.
जागतिक घडामोडींमुळे सोन्याच्या किंमतीत वाढ
दरम्यान, जागतिक राजकीय तणाव आणि अमेरिका, इस्रायल व इराण यांच्यात वाढलेल्या संघर्षाचा परिणाम सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्यावर दिसून येत आहे. जागतिक बाजारात स्पॉट गोल्ड ०.८% वाढून ५,१७७ डॉलर प्रति औंस झाले आहे. भारतीय कमोडिटी एक्सचेंज MCX वरही गुरुवारी सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ नोंदवली गेली. भारतात २४ कॅरेट सोने ०.६% वाढून ₹१,६२,५४३ प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. तर, चांदी १.८६% वाढून ₹२,७०,५०१ प्रति किलो झाली आहे.
Web Summary : Venezuela will export 1000 kg of gold to the US following a deal between Minorven and Trafigura. This marks improved relations after Maduro's exit, with focus on mining, energy, and oil. Global tensions are driving gold prices up.
Web Summary : वेनेजुएला माइनरवेन और ट्राफिगुरा के बीच एक समझौते के बाद अमेरिका को 1000 किलो सोना निर्यात करेगा। यह मादुरो के जाने के बाद बेहतर संबंधों का प्रतीक है, जिसमें खनन, ऊर्जा और तेल पर ध्यान केंद्रित किया गया है। वैश्विक तनाव सोने की कीमतों को बढ़ा रहे हैं।