Ashwini Vaishnav Exclusive: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल (1 फेब्रुवारी 2025) देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. अर्थसंकल्पानंतर लगेचच रेल्वेमंत्रीअश्विनी वैष्णव यांनी रेल्वेच्या सुरक्षितता आणि विकासाबाबत महत्त्वाची घोषणा केली. रेल्वेचे आधुनिकीकरण आणि डिजिटल प्रणालीला चालना देण्यासाठी नवीन पावले उचलण्याबाबत त्यांनी भाष्य केले.
अर्थसंकल्पात रेल्वेच्या वाट्याला काय आले?2025 च्या अर्थसंकल्पात रेल्वेबाबत कोणतीही विशिष्ट घोषणा करण्यात आलेली नाही. रेल्वे मंत्रालयाच्या बजेटमध्ये केवळ 52 कोटी रुपयांची अतिरिक्त भर पडली आहे. याबाबत रेल्वेमंत्री म्हणाले की, रेल्वेकडे बरेच लक्ष देण्यात आले आहे. रेल्वेसाठी 2.5 लाख कोटी रुपयांची तरतूद आहे. गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेचे विद्युतीकरण, नवीन रेल्वे ट्रॅक टाकणे, स्थानके सुधारणे...अशा अनेक कामांवर लक्ष केंद्रित केले आहे.
100 नवीन अमृत भारत ट्रेन धावणार
वैष्णव पुढे म्हणतात, या अर्थसंकल्पात 4.60 लाख कोटी रुपयांचे नवीन प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत, ज्यात नवीन मार्ग, दुहेरीकरण, कार्यशाळा सुधारणे, देखभाल पद्धतींमध्ये सुधारणा यांचा समावेश आहे. सुरक्षेसाठी 1.16 लाख कोटी रुपयांची तरतूद आहे. 50 नवीन नमो भारत गाड्या चालवल्या जातील, ज्या कानपूर ते लखनौ, बंगळुरू-म्हैसूर सारख्या कमी अंतरावरील असतील. याशिवाय, अमृत भारत ट्रेनने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांसाठी 100 नवीन अमृत भारत ट्रेन चालवल्या जातील, तर 200 नवीन वंदे भारत ट्रेनदेखील सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय, 1000 अंडर पास आणि 1300 नवीन स्टेशनचे काम प्रगतीपथावर आहे.
बुलेट ट्रेन अन् डीपसीक Ai वर काय म्हणाले
बुलेट ट्रेनबाबत रेल्वेमंत्री म्हणाले, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे मार्गाचे 340 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. सध्या पुलाचे काम सुरू आहे, बुलेट ट्रेन लवकरात लवकर सुरू होईल. काम वाढवण्यासाठी एआयचीही मदत घेतली जात आहे. दरम्यान, चीनच्या AI मॉडेल डीपसीकवर जगभरातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. डेटा सुरक्षेशी संबंधित प्रश्नावर केंद्रीय मंत्री म्हणाले, डीपसीकची सखोल चौकशी केली जात आहे. त्याचे मूल्यमापन आणि तंत्रज्ञानावर काम सुरू आहे. आमचे तज्ज्ञ जे सांगतील ते आम्ही करू.