Amit Shah On Banking Sector: केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी सोमवारी शहरी सहकारी बँकांसाठी दोन मोबाईल ॲप्लिकेशन्स - 'सहकार डिजी पे' आणि 'सहकार डिजी लोन' लाँच केली. डिजिटल पेमेंट हे वेगाने वाढणाऱ्या कॅशलेस अर्थव्यवस्थेत या बँकांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितले. शहरी सहकारी कर्ज क्षेत्रावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित करताना, शाह यांनी शहरी सहकारी बँका (UCBs) आणि सहकारी पतसंस्था यांना अधिक व्यावसायिक बनवण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांची माहिती दिली.
या क्षेत्राच्या परिस्थितीत झालेल्या उल्लेखनीय सुधारणेकडे त्यांनी लक्ष वेधलं, जिथे गेल्या दोन वर्षांत एनपीए (Non-Performing Assets - NPA) २.८ टक्क्यांवरून ०.६ टक्क्यांपर्यंत खाली आल्या आहेत. शाह म्हणाले, "एनपीएमध्ये चांगली सुधारणा झाली आहे. त्यांच्या कार्यप्रणालीत आणि वित्तीय शिस्तीत सुधारणा झाली आहे." त्यांनी नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीज लिमिटेडला (NAFCUB) पुढील विस्तार करण्याची विनंती केली.
१५०० बँकांना जोडण्याचे लक्ष्य
शाह यांनी एनएएफसीयूबी साठी एक महत्त्वाकांक्षी लक्ष्य निश्चित करत पुढील पाच वर्षांत दोन लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या प्रत्येक शहरात किमान एक अतिरिक्त शहरी सहकारी बँक स्थापन करावी असं म्हटलं. यशस्वी सहकारी पतसंस्थांचं रूपांतर शहरी सहकारी बँकांमध्ये करावं, असंही त्यांनी फेडरेशनला सांगितलं.
"डिजिटल पेमेंट ही काळाची गरज आहे. आपल्याला माहीत आहे की पेमेंटच्या पद्धती बदलल्या आहेत. डिजिटल पेमेंटचा कल वाढत आहे आणि जर शहरी सहकारी बँकांनी या बदलाशी समन्वय साधला नाही, तर त्या या शर्यतीतून बाहेर पडतील," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
या व्यासपीठाशी दोन वर्षांच्या आत १५०० बँकांना जोडण्याचं लक्ष्य शाह यांनी ठेवलं आहे. राष्ट्रीय प्रगतीचा मापदंड केवळ जीडीपी (GDP) वाढ असू शकत नाही, यावर त्यांनी जोर दिला. "जीडीपीमध्ये वाढ झाली पाहिजे, पण त्यासोबतच उपजीविकेचे पर्याय देखील निर्माण झाले पाहिजेत, जे सहकारी बँका करू शकतात," असंही शाह म्हणाले. त्यांनी शहरी सहकारी बँकांना तरुण उद्योजक आणि आर्थिकदृष्ट्या वंचितांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केलं.
Web Summary : Amit Shah launched digital banking apps for cooperative banks, emphasizing digital payments' importance. He noted improved NPA figures and urged expansion, aiming to connect 1500 banks. Shah stressed creating livelihood options alongside GDP growth, focusing on young entrepreneurs and the financially excluded.
Web Summary : अमित शाह ने सहकारी बैंकों के लिए डिजिटल बैंकिंग ऐप लॉन्च किए, डिजिटल भुगतान के महत्व पर जोर दिया। उन्होंने एनपीए के बेहतर आंकड़ों पर ध्यान दिया और 1500 बैंकों को जोड़ने के लक्ष्य के साथ विस्तार का आग्रह किया। शाह ने जीडीपी विकास के साथ-साथ आजीविका के विकल्प बनाने पर जोर दिया, युवा उद्यमियों और वित्तीय रूप से वंचितों पर ध्यान केंद्रित किया।