Canara Bank Special FD : अस्थिर शेअर बाजारात तुम्ही जर खात्रीशीर गुंतवणूक योजना शोधत असाल तर तुमच्यासाठी कॅनरा बँकेची मुदतठेव योजना सर्वोत्तम आहे. सध्याच्या काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असले तरी, बँकेने आपल्या 'स्पेशल एफडी' योजनेवर ७ टक्क्यांहून अधिक व्याजदर जाहीर करून ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यामध्ये तुम्ही १ लाख रुपये गुंतवणुकीवर ३९,७५० रुपये फिक्स व्याज मिळवू शकता.
५५५ दिवसांची 'स्पेशल' योजनाकॅनरा बँकेत तुम्ही किमान ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंत एफडी करू शकता. मात्र, बँकेची ५५५ दिवसांची विशेष योजना सर्वाधिक लोकप्रिय ठरत आहे. या योजनेत सामान्य नागरिकांना ६.५०% व्याज. तर ज्येष्ठ नागरिक (६० वर्षांवरील) ७.००% व्याजदर मिळवू शकतात. तर अति ज्येष्ठ नागरिकांसाठी (८० वर्षांवरील) सर्वाधिक ७.१०% व्याजदर आहे.
१ लाख रुपयांवर किती परतावा मिळणार?ज्येष्ठ नागरिक : जर तुम्ही या योजनेत १ लाख रुपये गुंतवले, तर मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला मिळणारी रक्कम थक्क करणारी आहे. १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ५५५ दिवसांनंतर एकूण १,३९,७५० रुपये मिळतील. म्हणजेच तुम्हाला ३९,७५० रुपये केवळ व्याजापोटी मिळतील. तर सामान्य नागरिकांसाठी १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर एकूण १,३६,३५४ रुपये मिळतील, ज्यामध्ये ३६,३५४ रुपये फिक्स व्याज असेल.
वाचा - ट्रम्प यांच्या एका निर्णयाने बाजारात दिवाळी! सेन्सेक्स-निफ्टीत उसळी; 'या' शेअर्समध्ये तुफान खरेदी
रेपो रेटमधील कपातीचा परिणामगेल्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये १.२५ टक्क्यांची मोठी कपात केली होती. यामुळे गृहकर्ज आणि कार लोन स्वस्त झाले असले, तरी बँकांनी एफडीवरील व्याजदरातही कपात केली होती. केनरा बँकेने देखील व्याजदर काही प्रमाणात कमी केले आहेत, तरीही इतर बँकांच्या तुलनेत त्यांचे सध्याचे दर गुंतवणूकदारांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहेत.
Web Summary : Canara Bank's special FD scheme offers attractive interest rates, especially on the 555-day plan. Senior citizens can earn up to 7% interest. A ₹1 lakh investment can yield ₹1,39,750 for senior citizens and ₹1,36,354 for general citizens upon maturity, making it a lucrative option despite recent rate cuts.
Web Summary : केनरा बैंक की विशेष एफडी योजना आकर्षक ब्याज दरें प्रदान करती है, खासकर 555 दिनों की योजना पर। वरिष्ठ नागरिक 7% तक ब्याज अर्जित कर सकते हैं। ₹1 लाख का निवेश परिपक्वता पर वरिष्ठ नागरिकों के लिए ₹1,39,750 और सामान्य नागरिकों के लिए ₹1,36,354 दे सकता है, जो हालिया दर कटौती के बावजूद इसे एक आकर्षक विकल्प बनाता है।