Investment Tips : शेअर बाजारात सध्या सुरू असलेल्या चढ-उतारामुळे आणि जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, अनुभवी गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांच्या मते, जेव्हा बाजार घसरतो, तेव्हाच संपत्ती निर्मितीची खरी संधी दडलेली असते. 'एसआयपी'च्या माध्यमातून गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी सध्याची घसरण हा तोटा नसून एक प्रकारचा 'बंपर सेल' आहे.
घसरता बाजार म्हणजे 'युनिट्स'चा सेल!जेव्हा तुम्ही एसआयपी सुरू करता, तेव्हा तुम्ही दरमहा एक निश्चित रक्कम गुंतवता. बाजार घसरल्यामुळे चांगल्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कमी होतात, परिणामी तुमच्या त्याच ठराविक रकमेत तुम्हाला म्युच्युअल फंडात जास्त युनिट्स मिळतात. जेव्हा बाजार पुन्हा उसळी घेतो, तेव्हा स्वस्त दरात जमा झालेली ही जास्त युनिट्स तुमच्या पोर्टफोलिओचा परतावा वेगाने वाढवतात. यालाच गुंतवणुकीच्या भाषेत 'रुपी कॉस्ट एव्हरेजिंग' असे म्हणतात.
बाजार 'टाईम' करण्याच्या नादात संधी गमावू नकाअनेक नवीन गुंतवणूकदार बाजार अजून खाली जाण्याची वाट पाहतात. मात्र, बाजाराचा तळ शोधणे हे दिग्गज तज्ज्ञांनाही जवळजवळ अशक्य असते. अनेकदा बाजार अचानक रिकव्हरी दाखवतो आणि वाट पाहणारे गुंतवणूकदार संधी गमावून बसतात. एसआयपीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हेच आहे की, यात तुम्हाला बाजाराच्या स्थितीचा विचार न करता शिस्तबद्ध गुंतवणूक करता येते.
तज्ज्ञांचा सल्ला : एसआयपी बंद करू नका!सध्याच्या अस्थिर काळात गुंतवणूकदारांनी आपली सुरू असलेली एसआयपी कोणत्याही परिस्थितीत बंद करू नये. उलट, जर तुमच्याकडे अतिरिक्त भांडवल असेल, तर घसरलेल्या बाजारात 'टॉप-अप' करणे दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरू शकते.
वाचा - रेशनवर पुन्हा 'रॉकेल' मिळणार? LPG टंचाईच्या सावटाखाली रेशन दुकानदारांची केंद्राकडे मागणी
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Market volatility offers SIP investors a 'bumper sale' on units. Experts advise against stopping SIPs; consider 'topping up' investments. Rupee cost averaging benefits long-term portfolios. Don't try timing the market; stay invested.
Web Summary : बाजार की अस्थिरता एसआईपी निवेशकों को यूनिट्स पर 'बम्पर सेल' प्रदान करती है। विशेषज्ञ एसआईपी रोकने के खिलाफ सलाह देते हैं; 'टॉपिंग अप' निवेश पर विचार करें। रुपये की लागत औसत लंबी अवधि के पोर्टफोलियो को लाभ पहुंचाती है। बाजार का समय तय करने की कोशिश न करें; निवेशित रहें।