Join us

NAV म्हणजे नक्की काय हो? Mutual Fund मध्ये गुंतवणूक करत असाल तर हे माहितच हवं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 09:29 IST

म्युच्युअल फंडमध्ये एनएव्ही ही संज्ञा अत्यंत महत्त्वाची आहे. जाणून घेऊ कशी ठरवली जाते ही एनएव्ही.

एनएव्ही म्हणजे म्युच्युअल फंडच्या प्रती युनिटचा योग्य दर. म्युच्युअल फंडमध्ये एनएव्ही ही संज्ञा अत्यंत महत्त्वाची आहे. एनएव्ही म्हणजे नेट असेट व्हॅल्यू. बाजाराच्या दिशेवर एनएव्हीचा दर ठरला जातो आणि त्यानुसार वर खाली होत असतो. म्युच्युअल फंड खरेदी करताना ज्या दिवशी खरेदीचा व्यवहार होत असतो, त्या दिवशीच्या एनएव्ही दरानुसार गुंतवणूकदारांना युनिट्स दिले जातात. जसा एनएव्हीचा दर वाढत जातो तसतसे म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे मूल्य वाढत जाते.

एनएव्ही दर नेमका कसा ठरविला जातो? 

सेबी म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी ज्या नियमावली तयार केल्या आहेत, त्यात एनएव्ही ठरविण्याच्या पद्धती नमूद केल्या आहेत. उदा इक्विटी प्रकारातील म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूकदारांनी ज्या विशिष्ट योजनेत रक्कम गुंतवली आहे त्यातील सिक्युरिटीचे बाजारातील सध्याचे मूल्य हे एनएव्ही ठरविण्यासाठी सर्वांत महत्त्वाचा घटक असतो.  यात इतर मिळकत जसे व्याज, डिव्हिडंड  किंवा येणे बाकी रक्कम समाविष्ट केले जाते. इक्विटीमधून झालेला नफाही यात समाविष्ट केला जातो. या सर्व बेरजेतून  स्कीम खर्च आणि इतर देय रक्कम वजा करून एनएव्ही काढली जाते. हे सर्व एका उदाहरणांतून समजून घेऊ.

इक्विटी स्टॉक मूल्य  : रु २५० कोटीइतर गुंतवणूक मूल्य : रु १० कोटीडिव्हिडंड येणे बाकी : रु ५ कोटीशेअर्स विक्री करून येणे बाकी : रु ५ कोटीशेअर खरेदी देणे बाकी : रु १० कोटीफी देणे बाकी : रु ०.५० कोटीएकूण युनिट्स : ३ कोटी (गुंतवणूकदारांकडे असलेल्या एकूण युनिट्सची संख्या)एनएव्ही : सध्याची गुंतवणूक मूल्य   येणे रक्कम वजा रक्कम देणे   खर्च  भागिले एकूण युनिट्स. एनएव्ही : २५० १० ५ ५ (२७०) वजा १० ०.५०(१०.५०) भागिले ३ = ८६.५०/-प्रतियुनिट एनएव्ही : रु ८६.५०/-(आकडेवारी फक्त उदाहरणादाखल दिली आहे)

एनएव्ही कशी वाढते?  

वरील उदाहरणात इतर आकडेवारी आहे तशीच ठेवून इक्विटी स्टॉक मूल्य ३०० कोटी रुपये झाले आणि युनिट्सची संख्या ३ कोटी २० लाख झाली असता एनएव्ही ९६.७२ येते. आता २५० चे ३०० कोटी कसे झाले असतील हा प्रश्न आपल्या मनात आला असेल. याचे उत्तर बाजारात तेजी आली आणि त्यानुसार इक्विटी शेअर्सचे भाव वाढून एकूण स्टॉक मूल्य वाढले.

टॅग्स :गुंतवणूकपैसा