Mutual Funds : नवीन गुंतवणूकदारांसाठीशेअर बाजारात थेट गुंतवणूक करणे धोकादायक असते. अशा परिस्थितीत गुंतवणूक सल्लागार सुरुवातीला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. जर तुमच्याकडे एकरकमी पैसे नसतील तुम्ही दरमहा एसआयपीच्या स्वरूपात म्युच्युअल फंडात लहान रक्कम गुंतवू शकता. गेल्या महिन्याभरात म्युच्युअल फंडात तब्बल २६,००० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. यावरुन याची लोकप्रियता लक्षात येईल. शिवाय दीर्घकालीन गुंतवणूक असेल तर तुमची जोखीम बऱ्यापैकी कमी होते. गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहिला तर म्युच्युअल फंडांनी सरासरी १२ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. हे सर्व पाहताना अनेकजण म्युच्युअल फंडाच्या खर्चाकडे दुर्लक्ष करतात. हे विविध खर्च तुमची कमाई कमी करू शकतात.
म्युच्युअल फंडांमधील तुमची गुंतवणूक मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या (एएमसी) द्वारे व्यवस्थापित केली जाते. प्रत्येक म्युच्युअल फंड योजनेसाठी, एएमसी एक फंड मॅनेजर नियुक्त करते, ज्याला बाजार तज्ञ आणि आर्थिक विश्लेषकांच्या टीमची मदत मिळते. या व्यावसायिकांच्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी, एएमसी गुंतवणूकदारांकडून काही शुल्क आकारतात, जे गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घेणे महत्वाचे आहे.
प्रवेश शुल्क (एन्ट्री लोड)जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच म्युच्युअल फंड योजनेचे युनिट्स खरेदी करता तेव्हा हे शुल्क आकारले जाते.
एक्झिट लोडजेव्हा तुम्ही तुमचे म्युच्युअल फंड युनिट्स विकता किंवा रिडीम करता तेव्हा हे शुल्क लागू होते. हे शुल्क निश्चित नसून वेगवेगळ्या योजनांसाठी ते बदलू शकते. साधारणपणे ते ०.२५% ते ४% पर्यंत असू शकते, जे तुम्ही कोणत्या प्रकारच्या योजनेत गुंतवणूक केली आहे. तुम्ही किती वेळानंतर तुमचे युनिट्स काढत आहात यावर अवलंबून असते. गुंतवणूकदारांना दीर्घकाळ गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे.
व्यवस्थापन शुल्कतुमच्या योजनेचे व्यवस्थापन करण्यासाठी ही फी फंड मॅनेजर आणि त्याच्या टीमला दिली जाते.
खाते शुल्कजर तुम्ही तुमच्या खात्यात आवश्यक असलेली किमान शिल्लक राखण्यात अयशस्वी झालात तर एएमसी कधीकधी हे शुल्क आकारू शकते. हे तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमधून थेट वजा केले जाते.
सेवा आणि वितरण शुल्कप्रिंटिंग, मेलिंग आणि मार्केटिंग यासारख्या खर्चासाठी एएमसीकडून हे शुल्क आकारले जाते.
वाचा - 'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
स्विच फीजर एखाद्या म्युच्युअल फंड योजनेमुळे तुम्हाला तुमची गुंतवणूक एका योजनेतून दुसऱ्या योजनेत स्विच करण्याची परवानगी मिळते, तर या सेवेसाठी एएमसीकडून स्विच शुल्क आकारले जाऊ शकते.