Join us

बाजाराच्या घसरणीतही 'या' ४ म्युच्युअल फंडांनी दिला बंपर परतावा; बँक एफडीपेक्षी कधीही सरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 14:30 IST

Mutual Fund : शेअर बाजारात सध्या सगळीकडे नैराश्य पसरलं आहे. मात्र, त्यातही हुशारीने गुंतवणूक करणारे आजही फायद्यात आहे.

Mutual Fund : ऑक्टोबर २०२४ मध्ये शेअर बाजारात सुरू झालेली घसरणीला अद्यापही ब्रेक लागला नाही. अधूनमधून थोडीफार सुधारणे होते. मात्र, त्याने गुंतवणूकादांना फारसा लाभ झालेला नाही. स्टॉक्स सोडा म्युच्युअल फंड असलेले पोर्टफॉलिओ देखील आता लाल रंगात गेले आहेत. मात्र, अशा परिस्थितीतही हुशारीने निर्णय घेतलेल्या गुंतवणूकदार मात्र बिनधास्त आहेत. कारण, बाजाराच्या घसरणीतही ४ म्युच्युअल फंडांनी बँकांच्या एफडीपेक्षा जास्तच परतावा दिला आहे. कमी कालावधीच्या म्युच्युअल फंड योजनांनी गुंतवणूकदारांना बँक एफडीच्या तुलनेत ७.५१ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.तर ३ वर्षांत या योजनेने ७ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.

तीन वर्षांची गुंतवणूकॲक्सिस शॉर्ट ड्युरेशन फंड हा या फंड हाउसपैकी एक आहे. ही एक खुली अल्प मुदतीची कर्ज योजना आहे. यामध्ये प्रामुख्याने १ ते ३ वर्षांसाठी गुंतवणूक केली जाते. हा फंड उच्च दर्जाच्या आणि कमी जोखमीच्या धोरणाचा अवलंब करतो. ज्यामुळे स्थिर परतावा मिळतो. हा फंड कमी कालावधी आणि व्याजदरांच्या आधारे दीर्घकाळात संतुलित परतावा देतो. त्याचा पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण आहे. तुम्ही यामध्ये एका वर्षाच्या दृष्टीकोनातून गुंतवणूक करू शकता. हा फंड प्रामुख्याने AAA आणि A1+ रेट केलेल्या मालमत्ता किंवा त्यांच्या समकक्ष ठिकाणी गुंतवणूक करते.

फंडपरतावा
एचडीएफसी७.७२ टक्के
अ‍ॅक्सीस७.६१ टक्के
निप्पॉन७.६० टक्के

बिर्ला

७.५१ टक्क

एक वर्षाचा परतावाया प्रकारची फंड योजना कॉर्पोरेट बाँड्स, सरकारी रोखे आणि मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्सचा मागोवा घेते. हे कॉर्पोरेट बाँड्स आणि २ ते ५ वर्षांच्या सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करते. वैयक्तिक सिक्युरिटीजमध्ये कोणतेही बंधन नाही.

कॉर्पोरेट बाँडमध्ये ६१% गुंतवणूककॉर्पोरेट बाँड्समध्ये ॲक्सिस शॉर्ट ड्युरेशनची गुंतवणूक ६१ टक्के आहे तर सरकारी बाँडमध्ये ती २५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. गुंतवणूकदारांसाठी चांगली गोष्ट म्हणजे या फंडात एन्ट्री किंवा एक्झिट लोड नाही. ८,७८० कोटी रुपये इतकी मालमत्ता त्यांची व्यवस्थापनाखाली आहे. यामध्ये तुम्ही एकरकमी किमान ५००० आणि १००० रुपयांपासून एसआयपी सुरू करू शकता. २०१३ च्या सुरूवातीला जर कोणी या योजनेत १०,००० रुपये गुंतवले असतील तर ती रक्कम ३१ जानेवारी २०२५ पर्यंत २५,८२४ रुपये झाली असती.

(Disclaimer- यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकशेअर बाजारशेअर बाजार