Join us

या 5 ELSS म्युच्युअल फंडांनी शेअर बाजारालाही टाकलं मागे; कमाईच्या बाबतीत कोण ठरलं सरस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 11:31 IST

elss mutual funds : टॉप ५ ELSS फंडांनी गेल्या एका वर्षात उत्कृष्ट परतावा दिला आहे. यात एसबीआयने लाँग टर्म इक्विटी फंडाने ३२.९६% परतावा दिला आहे. तर क्वांटम ELSS ने २५% पेक्षा जास्त परतावा दिला.

elss mutual funds : २०२४ वर्ष संपायला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत नवीन वर्षापासून नवीन संकल्प आणि ध्येय घेऊन तुम्ही सुरुवात कराल यात शंका नाही. आजच्या काळात आर्थिक नियोजन ही काळाजी गरज बनली आहे. २०२५ मध्ये तुम्ही देखील काही आर्थिक ध्येय नक्कीच ठरवली असतील. याच ध्येयाला आणखी मजबूत करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी खास माहिती घेऊन आलो आहोत. शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, शेअर बाजारापेक्षा जास्त कमाई करणाऱ्या ५ ELSS म्युच्युअल फंड फंडांबद्दल जाणून घेऊया.

कर वाचवण्यासाठी अनेक पर्याय आहेत, ज्यात PPF, NSC, NPS इत्यादींचा समावेश आहे. मात्र, याशिवाय कर वाचवण्यासाठी तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करू शकता. हे म्युच्युअल फंड ‘इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम’ (ELSS) म्हणून ओळखले जातात.

ELSS म्हणजे काय?इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम्स (ELSS) हे असे म्युच्युअल फंड आहेत, जे कमीत कमी ८० टक्के रक्कम शेअर बाजारात गुंतवतात. २००५ मध्ये वित्त मंत्रालयाने हे अधिसूचित केलं होतं. या फंडांचा लॉक-इन कालावधी ३ वर्षांचा असतो, जो कर बचतीच्या इतर पर्यायांपैकी सर्वात कमी आहे. ELSS योजना कलम 80C अंतर्गत कर सवलतीसाठी पात्र आहे. तुम्ही एका वर्षात दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करून कर वाचवू शकता.

मागील एका वर्षाच्या कामगिरीवर आधारित टॉप ELSS फंड

  • SBI लाँग टर्म इक्विटी फंड – ३२.९६%
  • बँक ऑफ इंडिया ELSS टॅक्स सेव्हर फंड - २७.७३%
  • बडोदा BNP परिबा ELSS टॅक्स सेव्हर फंड - २७.४२%
  • DSP ELSS टॅक्स सेव्हर फंड - २७.५७%
  • HSBC ELSS टॅक्स सेव्हर फंड – ३६.८०%

या टॉप ५ ELSS फंडांनी गेल्या एका वर्षात उत्कृष्ट परतावा दिला आहे, जो २५% ते ३६% पर्यंत आहे. SBI लाँग टर्म इक्विटी फंडाने ३२.९६% परतावा दिला आहे. तर क्वांटम ELSS ने २५% पेक्षा जास्त परतावा दिला. इतर चांगली कामगिरी करणाऱ्या फंडांमध्ये SBI लाँग टर्म इक्विटी फंड, बँक ऑफ इंडिया ELSS टॅक्स सेव्हर फंड, HSBC ELSS टॅक्स सेव्हर फंड आणि बडोदा BNP पारिबा ELSS टॅक्स सेव्हर फंड यांचा समावेश आहे. 

टॅग्स :गुंतवणूकशेअर बाजारइन्कम टॅक्स