Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाजार कोसळण्याची वाट पाहणे योग्य की अयोग्य? २० वर्षांच्या आकडेवारीने गुंतवणूकदारांचा संभ्रम दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 17:16 IST

SIP Investment Tips : गुंतवणूकदार सामान्यतः एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी महिन्याच्या नीचांकी पातळीची वाट पाहतात. पण प्रश्न असा आहे की, याचा परताव्यावर काही परिणाम होतो का की ती फक्त एक मानसिक चिंता आहे?

SIP Investment Tips : शेअर बाजारातगुंतवणूक करताना "योग्य वेळ कोणती?" या प्रश्नाने मध्यमवर्गीय गुंतवणूकदार नेहमीच त्रस्त असतो. बाजार पडण्याची वाट पाहत अनेकजण गुंतवणुकीचा निर्णय लांबणीवर टाकतात. मात्र, जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या डिसेंबरच्या ताज्या अहवालाने हा गैरसमज मोडीत काढला आहे. गेल्या २० वर्षांच्या (२००६-२०२५) आकडेवारीचे विश्लेषण केल्यानंतर असे समोर आले आहे की, बाजारात 'टायमिंग' साधण्यापेक्षा तुमचा 'संयम' अधिक मोलाचा ठरतो.

'लोएस्ट लेव्हल' शोधणे म्हणजे केवळ मानसिक ताण!अनेक गुंतवणूकदार महिनाभर बाजारातील सर्वात खालच्या पातळीची वाट पाहतात. पण आकडेवारी काय सांगते ते पाहा. ज्याने गेल्या २० वर्षांत दर महिन्याच्या सर्वात खालच्या स्तरावर पैसे लावले, त्याला वार्षिक १४.०३% परतावा मिळाला. ज्याने कोणतीही वेळ न पाहता दर महिन्याच्या शेवटी आपली एसआयपी सुरू ठेवली, त्याला वार्षिक १३.६५% परतावा मिळाला. या दोघांमधील फरक केवळ ०.३८% इतकाच आहे. म्हणजेच, बाजाराची तळाची पातळी शोधण्यासाठी मानसिक दबाव घेण्यापेक्षा सातत्याने गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर ठरते.

तारीख आणि वार महत्त्वाचे नाहीत!एसआयपी १ तारखेला करावी की २५ तारखेला? रोज करावी की आठवड्याला? या वादावरही या अहवालाने पडदा टाकला आहे. 'निफ्टी-५००' च्या २० वर्षांच्या कामगिरीनुसार, गुंतवणुकीची वारंवारता कोणतीही असली (दैनिक, साप्ताहिक किंवा मासिक), तरी सरासरी परतावा १३.६३% ते १३.७७% याच दरम्यान राहिला आहे. त्यामुळे तांत्रिक बाबींमध्ये अडकण्यापेक्षा गुंतवणूक सुरू ठेवणे महत्त्वाचे आहे.

दीर्घकालीन गुंतवणुकीत जोखीम 'शून्य'!बाजारातील घसरणीला घाबरून पैसे काढणाऱ्यांसाठी या अहवालात एक मोठा दिलासा दिला आहे. जर एखादा गुंतवणूकदार १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ आपली एसआयपी सुरू ठेवतो, तर ऐतिहासिकदृष्ट्या त्याचे नुकसान होण्याची शक्यता ०% (शून्य) राहिली आहे. ९५% प्रकरणांमध्ये १० वर्षांच्या कालावधीत गुंतवणूकदारांना १० टक्क्यांहून अधिक वार्षिक परतावा मिळाला आहे.

वाचा - बाजारात 'बुल्स'चे पुनरागमन! सेन्सेक्स ४८७ अंकांनी सुसाट; डिफेन्स शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल

मिडकॅपचा डंका!इक्विटी एसआयपीसाठी ७ ते ८ वर्षांचा काळ योग्य मानला जातो, पण १० वर्षांनंतर गुंतवणुकीचा वेग कमालीचा वाढतो. विशेषतः मिडकॅप श्रेणीतील फंडांनी दीर्घकाळात इतर श्रेणींच्या तुलनेत अधिक चमकदार कामगिरी केली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Market crash wait: Wise or not? Data clears investor confusion.

Web Summary : Timing the market is less crucial than consistent investing. Twenty-year data reveals SIP returns are similar regardless of market timing. Long-term SIP investments (10+ years) historically have zero loss probability, especially in mid-cap funds.
टॅग्स :म्युच्युअल फंडगुंतवणूकशेअर बाजारस्टॉक मार्केट