SIP Investment Tips : अवघ्या ५० रुपयांत कोट्याधीश म्हणजे लॉटरीचं तिकीट आहे की एखादी स्पाँजी स्किम? असा प्रश्न तुमच्या मनात येणे साहजिक आहे. मात्र, या दोन्ही गोष्टी नसून तुम्हाला फक्त योग्य ठिकाणी गुंतवणूक करायची आहे. हे दुसरं तिसरं काही नसून एसआयपी योजना आहे. एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून तुम्ही मोठा निधी उभारू शकता. एसआयपीमधील गुंतवणूक सातत्याने वाढत आहे.
SIP ने रचला विक्रमसिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) सतत नवीन विक्रम निर्माण करत आहे. एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्सच्या (AMFI) आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२४ मध्ये प्रथमच म्युच्युअल फंडातील SIP प्रवाह २६४५९ कोटी रुपयांवर पोहोचला. नोव्हेंबरमध्ये तो २५३२० कोटी रुपये होता. तर इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक डिसेंबरमध्ये ४११५५ कोटी रुपये होती. दर महिन्याला १५ टक्के वाढ झाली आहे.
दीर्घकालीन गुंतवणुकीतून फायदाअसे अनेक म्युच्युअल फंड आहेत ज्यांनी गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. तज्ञ म्युच्युअल फंडात दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करण्याची शिफारस करतात. जर तुम्हाला त्यात गुंतवणूक करून मोठा फंड जमा करायचा असेल तर किमान ३ किंवा ५ वर्षे गुंतवणूक करा. दीर्घकालीन गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याची हमी मानली जाते. अनेक म्युच्युअल फंडांनी दीर्घकालीन गुंतवणुकीवर १५ ते २० टक्के वार्षिक परतावा दिला आहे.
फक्त SIP मध्येच गुंतवणूक का करावी?वास्तविक, अनेक लोकांकडे गुंतवणुकीसाठी एकरकमी रक्कम नसते. अशा परिस्थितीत म्युच्युअल फंडात दर महिन्याला थोडीशी रक्कम गुंतवता येते. यामध्ये तुम्ही ऑनलाइन पैसेही गुंतवू शकता. सध्या अशा अनेक योजना आहेत ज्यात दरमहा ५०० रुपयांपासून एसआयपी सुरू करता येते. सेबी आता २५० रुपयांची एसआयपी सुरू करण्याचा विचार करत आहे.
कोट्याधीश होण्याचे सूत्र काय आहे?तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता तेव्हा त्यात चक्रवाढ व्याजाची भर पडते. या कारणास्तव, एक छोटी रक्कम कालांतराने मोठी होते. जर तुम्ही दररोज ५० रुपये वाचवले तर तुम्ही एका महिन्यात १५०० रुपये जमा कराल. या १५०० रुपयांची SIP द्वारे दरमहा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा. तुम्हाला हे ३० वर्षे करावे लागेल.
चक्रवाढ व्याजाची जादू पहातुम्ही दरमहा १५०० रुपये जमा करत राहिला तर ५.४० लाख रुपये जमा होतात. या गुंतवणुकीवर तुम्हाला वार्षिक १५ टक्के व्याज मिळते असे आम्ही गृहीत धरले, तर ३० वर्षांत ९९.७४ लाख रुपये व्याज म्हणून जमा होतील. अशा परिस्थितीत, दरमहा १५०० रुपये गुंतवून तुम्ही ३० वर्षांत १ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी गोळा कराल.
डिस्क्लेमर: यात म्युच्युअल फंडाच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा कुठल्याही प्रकारे गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.